Madhya Pradesh family suicide: एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवले. त्यानंतर त्याच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या आई-वडिलांनीही रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवलं
भोपाळ (Madhya Pradesh family suicide) : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील मुलगा, वडील आणि आई अशा तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता या घटनेची पुनरावृत्ती आज देशभरात रक्षाबंधन आनंदात साजरं होत असताना मध्य प्रदेशमधील दामोह येथे घडली आहे. येथे आधाी एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवले. त्यानंतर त्याच्या (Madhya Pradesh family suicide) मृत्यूमुळे धक्का बसलेल्या आई-वडिलांनीही रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवलं एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
या (Madhya Pradesh family suicide) घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधन साजरे करण्यासाठी या कुटुंबातील धाकटा भाऊ बहिणीला आणण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेला होता. यादरम्यान, ही घटना घडली. दामोह जिल्ह्यातील करैया गावाजवळ मुकेश अहिरवार नावाच्या तरुणाने ट्रेनसमोर उडी मारून जीवन संपवले. दरम्यान, मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच जबर धक्का बसलेल्या आई वडिलांनीही धरमपुरा फाटक परिसरात रेल्वेसमोर उडी घेऊन आपल्या जीवनाचा शेवट केला.
या (Madhya Pradesh family suicide) घटनेमागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र कौटुंबिक वादामुळे ही घटना घडली असावी, असे सांगण्यात येत आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमागचे खरे कारण अधिक तपासानंतरच समोर येणार आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलीस आणि जीआरपीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. आता या प्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.