चोरी प्रकरण मानवतमध्ये

Manwat Burglary Crime: मानवत येथे घरफोडी; १५ तोळयाचे सोन्याचे दागीने लंपास

मानवतमध्ये घरफोडीमुळे अज्ञात चोरट्यांनी २ लाख ९२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. घटना क्रांती चौक परिसरात घडली.

By : देशोन्नति
Manwat Burglary Crime: मानवत येथे घरफोडी; १५ तोळयाचे सोन्याचे दागीने लंपास

क्रांती चौक परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा

मानवत (Manwat Burglary Crime) : शहरातील क्रांती चौक परिसरात घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सुमारे २ लाख ९२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटने बाबत अधिक माहिती अशी की, वासुदेव बाकळे व त्यांची पत्नी मेघा हे दोघेही मुलगा प्रतीक याला भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते. होळी व रंगपंचमी सणानिमित्त ते काही दिवस पुण्यातच थांबले दरम्यान, शेजारी राहणार्‍या महिलांनी फोन करून त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसत असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर बाकळे यांनी आपल्या पुतण्याला घर पाहण्या साठी पाठविले असता घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडलेले असल्याचे तसेच (Manwat Burglary Crime) घरातील कपाटाचे लॉक तोडून सामान अस्ताव्यस्त टाकलेले असल्याचे आढळून आले.

ही माहिती मिळताच बाकळे कुटुंबीय तातडीने मानवत येथे परतले. घरात पाहणी केली असता कपाटातील सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.या दागिण्यांची किंमत सुमारे २ लाख ९२ हजार रुपये आहे. या प्रकरणी वासुदेव दत्तात्र्य बाकळे यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026