शिक्षक भरती प्रक्रिया

शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त्या लवकरच सुरू होणार

Teacher Recruitment Process: जिल्हा परिषद आणि खासगी शाळांतील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलचा वापर केला जाणार असून, रोस्टर प्रमाणीकरणानंतर भरती प्रक्रिया पारदर्शक वेगाने पूर्ण होईल.

शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त्या लवकरच सुरू होणार

Teacher Recruitment Process

जिल्हा परिषद पवित्र पोर्टलद्वारे देणार नियुक्ती

नागपूर (Teacher Recruitment Process) : राज्यातील शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो डी.एड. आणि बी.एड. धारक उमेदवारांसाठी नोकरीची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषद आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच 'पवित्र पोर्टल'द्वारे भरली जाणार आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता मोठी गती मिळणार आहे.
जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधील शिक्षक भरती सध्या बंद आहे. मात्र, काही दिवसांत ती सुरू होणार आहे.  कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात गत आठवड्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत शिक्षक भरतीतील अडथळे दूर करून प्रक्रिया पारदर्शक करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील व शिलेबाजीला चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. आता केवळ 'पवित्र पोर्टल'द्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांनाच शासन मान्यता दिली जाईल आणि त्यांचे वेतन सुरू केले जाईल. खासगी संस्थांना त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती पोर्टलवर भरण्यापूर्वी मागासवर्गीय कक्ष आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 'बिंदूनामावली' (रोस्टर) प्रमाणित करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

खासगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनात अनेकदा गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी होत्या. यावर उपाय म्हणून आता हे समायोजन पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केले जाईल. तसेच, अनुकंपा तत्त्वावरील भरतीलाही वेग देण्यात आला आहे. प्राप्त १ हजार ४८ प्रस्तावांपैकी ७९१ प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित त्रुटी दूर करून ती पदेही लवकरच भरली जातील. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. रोस्टर प्रमाणीकरण आणि पवित्र पोर्टलमुळे खर्‍या अर्थाने पात्र आणि गुणवंत उमेदवारांना न्याय मिळेल, असेही शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीला शालेय शिक्षण उपसचिव आबासाहेब कवळे, शिक्षण संचालक महेश पालकर (पुणे), उपसंचालक राजेश कंकाळ (मुंबई), कक्ष अधिकारी संगीता श्रॉफ उपस्थित होत्या. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेश तांबे, शिक्षक संघटनेचे सरचिटणीस सतीश कांबळे, कार्याध्यक्ष बी. डी. धुरंधर, मुख्य संघटन सचिव परशराम गोंडाणे, उपाध्यक्ष विजयकुमार जाधव, संदीप कदम, राजेश सदावर्ते, सुरेश सोंगेकर, सुभाष मस्के, शेषराव वाकडे, मधुकर घनसावंत, अशोक गायकवाड, शिवाजी बिबराळे यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा झाली नव्हती. त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली आहे. जिल्हा परिषदेत शिक्षकांची भरती होणार आहे. तसेच  'पवित्र पोर्टल'द्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांनाच शासन मान्यता दिली जाईल, असे अनेक निर्णय बैठकीत घेण्यात आले आहे. शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
-परशराम गोंडाणे, मुख्य संघटन सचिव, कास्ट्राईब जि.प. शिक्षक कर्मचारी संघटना

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026