Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > करीअर

विज्ञान प्रदर्शनी आयोजित

School Science Exhibition: विज्ञाणाचे पंख लावून विध्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा: योगेश सातपुते

सातगावमध्ये शाळा विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण केले गेले.


school science exhibition विज्ञाणाचे पंख लावून विध्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा योगेश सातपुते

उच्च प्राथमिक शाळा, सातगाव येथे विज्ञान प्रदर्शनी

नागपूर (School Science Exhibition) : विज्ञान व विज्ञानाचे चमत्कार खरच अतुलनीय तसेच नेत्रदीपक असतात मनाला वेड लावणारे असे विज्ञानाचे चमत्कार आपल्या अवतीभवती व संपूर्ण जगात बघायला मिळत आहे. देशाचे भविष्य समजल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओढ लावण्यासाठी शनिवार दिनांक १४ मार्च ला सातगाव स्थित जिल्हा परिषद उच्चं प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यान करीता शाळेत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे (School Science Exhibition) उद्घाटक म्हणून सातगाव ग्रामपंचायत चे सरपंच योगेश सातपुते (पाटील),तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील आत्राम, सदस्य प्रियंका योगेश सातपुते, दिगंबर नागोसे, गणेश मते, राजकुमार मोरे, डोमाजी वाटकर, शाळेचे मुख्याध्यापक रमेश सावसाकडे, शिक्षक रवींद्र घायवट, रवी शर्मा आदी उपस्थित होते.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विज्ञान मार्गावर चालून कलाम यांचे स्वप्न साकार करण्याचा एक प्रयत्न जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केला.विद्यार्थ्यांनी डोळ्याचे पारणे फेडणारे वैज्ञानिक प्रयोग तयार करून विज्ञान प्रदर्शनीला हजेरी लावली. अनेक विद्यार्थ्यांनी या (School Science Exhibition) विज्ञान प्रदर्शनी आपला सहभाग नोंदवला.इयत्ता ३ ते ८ च्या विध्यार्थ्यानी जलचक्र, व्यसनाचे वाईट परिणाम, प्लास्टिकचा पुनर्वापर, ऑक्सिजन वायू ज्वलनास मदत करतो अशा विविध विषयावर मॉडेल्स तयार करून उत्कृष्ट्रीत्या सादरीकरण केले.सरपंच योगेश सातपुते व पाहुण्यांनी संपूर्ण प्रदर्शनीची पाहणी करून विद्यार्थ्यास शुभेच्छा दिल्या.

याकरिता शाळेतील शिक्षिका मनीषा बुटे,अनुराधा पाटोळे, राहाटे, वैशाली उमाटे, शिक्षक स्वप्नील रोकडे, रवींद्र घायवट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या विज्ञान प्रदर्शनीचे सफल व उत्कृष्ट आयोजन केले.

विद्यार्थ्यांनी खरोखरच विज्ञानाच्या उत्कृष्ट प्रयोगांचे नमुने सादर केले. या (School Science Exhibition) प्रयोगातूनच भारताला महासत्ता बनवणारे वैज्ञानिक नक्कीच तयार होतील. विज्ञानाचे पंख लावून विध्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा अशी आशा बाळगतो व या विद्यार्थ्यांना पुढील उज्वल भवीष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
-योगेश सातपुते, सरपंच, ग्राप सातगाव

Related to this topic: