Railway Recruitment

रेल्वेत 734 पदांची मोठी भरती; दहावी-ITI उत्तीर्णांना थेट संधी

सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी रेल्वे विभागाकडून महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

रेल्वेत 734 पदांची मोठी भरती; दहावी-ITI उत्तीर्णांना थेट संधी

दहावी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी; लेखी परीक्षा व मुलाखतीशिवाय होणार निवड

सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी रेल्वे विभागाकडून महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे कोच फॅक्टरी (RCF), कपूरथला येथे अप्रेंटिसच्या 734 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. वयोमर्यादेचा विचार करता, 5 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. नियमानुसार पात्र उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.

RCF कपूरथला अप्रेंटिस भरतीतील महत्त्वाची बाब म्हणजे निवडीसाठी उमेदवारांना स्वतंत्र लेखी परीक्षा किंवा मुलाखतीला सामोरे जावे लागणार नाही. दहावी आणि ITIमधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2026 आहे. तर अर्ज शुल्क भरण्यासाठी 8 सप्टेंबर 2026 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी RCF कपूरथलाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. वेबसाइटवर “Apply for online application of Act Apprentice Training” या पर्यायावर क्लिक करून सुरुवातीला नोंदणी करावी. त्यानंतर मागवण्यात आलेली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्काची प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज अंतिमरित्या सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर फडणवीसांचा टोला; “मुद्दे किती खरे आहेत, हे तपासून पाहा”

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर फडणवीसांचा टोला; “मुद्दे किती खरे आहेत, हे तपासून पाहा”

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर फडणवीसांचा टोला; उपवर्गीकरण आणि अग्निवीरांच्या सरकारी सेवेबाबतही मोठी माहिती.

Sep 29, 2026
MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC चा मोठा निर्णय; गट-क पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार

Sep 10, 2026
जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये ‘पायलट’ पदांची भरती; १२ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये ‘पायलट’ पदांची भरती; १२ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

JNPAच्या सागरी विभागात योजना-१ आणि योजना-२ अंतर्गत पायलट पदांची करार पद्धतीने भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Sep 09, 2026
ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये 93 जागांसाठी भरती; 17 ऑगस्टपर्यंत अर्ज

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये 93 जागांसाठी भरती; 17 ऑगस्टपर्यंत अर्ज

अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना GATE स्कोअर आणि मुलाखत या दोन्ही घटकांना प्रत्येकी 50 टक्के वेटेज दिले जाणार आहे.

Aug 10, 2026