लघुलेखक पदभरती

लघुलेखक पदभरतीसाठी भाजयुमोचे खा. अशोकराव चव्हाण यांना निवेदन

Stenographer Recruitment: भाजयुमोने माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे लघुलेखक पदभरतीसाठी निवेदन दिले. यात संवर्गातील रिक्त पदे भरण्याची व समांतर पद निर्माण करण्याची मागणी केली गेली.

लघुलेखक पदभरतीसाठी भाजयुमोचे खा. अशोकराव चव्हाण यांना निवेदन

Stenographer Recruitment

 

संबंधित विद्यार्थ्यांसाठी मार्ग काढून समांतर पद निर्माण करण्याची शशिकांत पा क्षीरसागर यांची मागणी

​मुंबई (Stenographer Recruitment) : मंत्रालयीन व महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांमधील लघुलेखक (स्टेनोग्राफर) संवर्गातील रिक्त पदे 'मृत' घोषित न करता त्यांची नियमित पदभरती करावी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी समांतर असे पद कॉम्प्युटर ऑपरेटर (Stenographer Recruitment) असे पद काढून या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने मंगळवारी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून आपण यात मार्ग काढून शासना कडे पाठपुरावा करावा अशी मागणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पा क्षीरसागर यांनी खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.

 या निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे की, एप्रिल २०२२ नंतर कोणतीही नवीन भरती जाहिरात न आल्याने आणि शासनाने अचानक १२६ संवर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ३ ते ४ वर्षे कठोर परिश्रम करून स्टेनोग्राफीचे कौशल्य आत्मसात करणारे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी आता वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

पदभरतीतील (Stenographer Recruitment) या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण आणि नैराश्य वाढत असून, कुशल मनुष्यबळ इतर क्षेत्रांकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे.​या पार्श्वभूमीवर, एप्रिल २०२२ पासून प्रलंबित असलेली भरती तात्काळ जाहीर करावी, रद्द केलेले १२६ संवर्ग पुन्हा सुरू करावेत आणि 'जीसीसी' उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी व पारदर्शक रोजगार धोरण आखून त्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशा मागण्या या निवेदन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.

या गंभीर बाबीची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पा क्षीरसागर यांनी केली.यावेळी करण चव्हाण, प्रियेश ठाकूर, शिवा लोट, अक्षय पवार, मारोती जाधव, युवराज शिंदे, प्रथम चौधरी यांसह मोठया प्रमाणात विध्यार्थी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026