Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > करीअर

11 वी ऑनलाइन प्रवेश

इयत्ता 11 वी प्रवेश 2026-27 चे सुधारित वेळापत्रक जाहीर; 6 जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू

11th Online Admission: इयत्ता ११व्या पाठ्यक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची नोंदणीची तारीखे ६ जुलै ते ८ जुलै राखली गेल्या आहेत.


इयत्ता 11 वी प्रवेश 2026-27 चे सुधारित वेळापत्रक जाहीर 6 जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू

11th Online Admission |

हिंगोली (11th Online Admission) : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राज्यातील इयत्ता 11 वीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील 9688 कनिष्ठ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्यात एकूण 14 लाख 73 हजार 420 विद्यार्थी संख्या असून त्यापैकी 10 लाख 8 हजार 94 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेश मार्गदर्शक पुस्तिका 29 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजेपासून ते 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी 6 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार असून 8 जुलै 2026 ही नोंदणीची अंतिम तारीख आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्ज 2 जुलै ते 3 जुलै 2026 या कालावधीत भरता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थी, इतर मंडळाचे विद्यार्थी तसेच मागील वर्षी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. विद्यार्थ्यांना अर्जासंदर्भातील माहिती एसएमएसद्वारे देखील दिली जाणार आहे.

सीएपी फेरी, व्यवस्थापन कोटा तसेच अल्पसंख्यांक कोट्यासाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया असेल. गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना "Proceed for Admission" हा पर्याय निवडून प्रवेश निश्चित करावा लागेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तांत्रिक अडचणीसाठी support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर किंवा 8530955564 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आवाहन शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी केले आहे.