Breaking News
  • दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग साठी रस्ता बंद
  • महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट
  • विदर्भातील २६ मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४९.७६ टक्के जलसाठा
  • पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद
  • अमरावती विमानतळावर 'नाईट लँडिंग' पुन्हा रखडले!
  • नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी MIDC परिसरात कंपनीत आग
  • शहादा शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा...
  • साई नगरीत तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
  • सोलापूर- मुळेगाव गोळीबारातील मुख्य सूत्रधाराला केले जेरबंद

होम > करीअर

हायकोर्ट महत्त्वपूर्ण निर्णय

नावातील तफावतीमुळे अपात्र ठरवण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द

Hingoli CAPF Recruitment: हिंगोलीच्या टोव्हा येथील रामप्रसाद शेळके याची नावातील तफावतीमुळे अपात्रता रद्द करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला.


नावातील तफावतीमुळे अपात्र ठरवण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द

Hingoli CAPF Recruitment |

हिंगोली जिल्ह्यातील  'टोव्हा' येथील उमेदवाराला दिलासा

हिंगोली (Hingoli CAPF Recruitment) : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 2025 भरती प्रक्रियेत केवळ नावातील किरकोळ तांत्रिक तफावतीमुळे पात्र उमेदवाराला अपात्र ठरवणे मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले आहे.  हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा कळमनुरी तालुक्यातील टोव्हा' या गावातील उमेदवार रामप्रसाद मोहनराव शेळके याला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, त्याची पुढील वैद्यकीय चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या या याचिकेवर ८ एप्रिल रोजी खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

कळमनुरी तालुक्यातील टोव्हा येथील रामप्रसाद शेळके याने (Hingoli CAPF Recruitment) एसएससी मार्फत (SSC) घेण्यात आलेल्या कॉन्स्टेबल (GD) पदाच्या परीक्षेत १०६.३७ गुण मिळवून लेखी परीक्षेत मोठे यश संपादन केले होते. त्यानंतर त्याने खडतर मानली जाणारी शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) देखील यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली होती. मात्र, १ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या कागदपत्र पडताळणीत त्याला धक्का बसला. ऑनलाईन अर्जावर त्याने केवळ 'रामप्रसाद' असे नाव लिहिले होते, तर दहावीच्या प्रमाणपत्रावर 'शेळके रामप्रसाद मोहनराव' असे पूर्ण नाव होते. याच एका तांत्रिक मुद्द्यावर त्याला अपात्रतेचे पत्र (Rejection Slip) देण्यात आले होते.

प्रशासनाच्या या निर्णयाला रामप्रसादने अ‍ॅड. अक्षय आनंद मस्के यांच्यामार्फत रिट याचिका क्र. ३१८४/२०२६ द्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले. अ‍ॅड. मस्के यांनी युक्तिवाद केला की, उमेदवाराने भरतीचे सर्व टप्पे (लेखी आणि शारीरिक परीक्षा) स्वतःच्या क्षमतेवर पार केले आहेत. त्याची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आणि इतर अधिकृत दस्तऐवज उपलब्ध असताना केवळ अर्जातील संक्षिप्त नावामुळे त्याला प्रक्रियेतून बाहेर काढणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायमूर्ती आर. आय. चागला आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठणा यांच्या खंडपीठाने प्रशासनाचा अपात्रतेचा निर्णय रद्दबातल ठरवला. न्यायालयाने खालील निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये  उमेदवाराला त्याच्या ऑनलाईन अर्जात नाव सुधारण्याची तात्काळ संधी देण्यात यावी, वैद्यकीय चाचणी: रामप्रसादला पुढील टप्प्यासाठी म्हणजेच सविस्तर वैद्यकीय परीक्षेसाठी (DME) पात्र उमेदवार म्हणून बोलावण्यात यावे, सशर्त नियुक्ती: जर उमेदवार वैद्यकीय परीक्षेत पात्र ठरला आणि त्याच्या प्रवर्गातील जागा रिक्त असतील, तर या आदेशाच्या दिनांकापासून चार आठवड्यांच्या आत त्याचे नाव शिफारस यादीत समाविष्ट करून नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी.

प्रशासनाने सुरुवातीला जागा रिक्त (Hingoli CAPF Recruitment) नसल्याचा दावा केला होता, परंतु अ‍ॅड. अक्षय मस्के यांनी वस्तुस्थिती आणि रिक्त जागांची उपलब्धता न्यायालयासमोर सिद्ध केल्याने हा निकाल उमेदवाराच्या बाजूने लागला. या निर्णयामुळे हिंगोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related to this topic: