आज जागतिक रंगभूमी दिन

रंगभूमीचे विविध पैलू आणि त्याचे महत्त्व याबद्दल सर्वसामान्यांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो.

आज जागतिक रंगभूमी दिन

World Theatre Day

दिनविशेष

नागपूर (World Theatre Day) : रंगभूमीचे विविध पैलू आणि त्याचे महत्त्व याबद्दल सर्वसामान्यांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो.

१९६१ मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन सन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. परंपरेनुसार, या दिवशी कोणत्याही थिएटरमधील प्रसिद्ध व्यक्तीने नाट्यगृहाच्या सद्यस्थितीबद्दल आपले मत व्यक्त करणारा संदेश दिला जातो. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. ठनाट्य निरंतरठ (संस्कृती आणि कला प्रवासाची सातत्य) ही यंदाच्या जागतिक रंगभूमी दिन २०२६ ची थीम आहे. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत.

बालरंगभूमीने नाटय व सिनेमा सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. मुबंई-पुणे वगळता व्यावसायिक नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडले आहेत. टीव्ही चॅनल्सची वाढती संख्या, मोबाइल, इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले. त्यामुळे व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे. मराठी रंगभूमीला वाचविण्यासाठी त्याचा उद्धार केला पाहिजे.

व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची सामुदायिक कला यातून कलाविष्काराला इंग्रजीत 'थिएटर' आणि मराठीत आपण 'रंगभूमी' हा शब्द वापरतो. नाटक हे वेगवेगळ्या भाषांमधून सादर केले जाते. ग्रीक, रोमन, ब्रिटीश, जर्मन, रशियन, अमेरिकन अशा वेगवेगळ्या भाषांमधून नाटकांचा हा प्रवाह चालत आलेला आहे. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके, तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली. विष्णुदास भावे यांच्या 'सीता स्वयंवर' या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. सन १८४३ मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता.

संबंधित सामग्री

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
नाट्य परिषदेचे यंदाचे पुरस्कार जाहीर; २० मे रोजी वितरण

नाट्य परिषदेचे यंदाचे पुरस्कार जाहीर; २० मे रोजी वितरण

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, लातूर महानगर शाखेच्या वतीने यंदाचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

May 13, 2026
परभणीत उद्या हिंदू संमेलनाचे आयोजन...!

परभणीत उद्या हिंदू संमेलनाचे आयोजन...!

Parbhani Hindu Sammelan: २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता सदगुरु नगर मैदान येथे हिंदू समाजामध्ये सामाजिक समरसता व राष्ट्रीय बांधिलकी दृढ करण्याच्या उद्देशाने हिंदू संमेलनाचे आयोजन केले जाईल.

Apr 20, 2026
पंकज कपूर यांची ११ एप्रिल रोजी मुलाखत

पंकज कपूर यांची ११ एप्रिल रोजी मुलाखत

दिग्गज अभिनेते पंकज कपूर शनिवार, ११ एप्रिल रोजी वनामती येथे दुपारी ४ वाजता नागपूरकर रसिकांसमोर आपल्या कारकिर्दीचे मर्म उलगडणार आहेत.

Apr 05, 2026
चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांची आज जयंती

चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांची आज जयंती

चित्रपटात आणि रंगभूमीवर अभिनय आणि आपल्या संवाद फेकीने जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य गाजवणारे मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांची २८ मार्च रोजी जयंती आहे.

Mar 28, 2026