बटवाडी रानडुकर हल्ला

बटवाडी येथे रानडुकराने केलेल्या हल्ल्यात महिलेचा हात निकामी

Batwadi wild boar attack: बटवाडी येथे रानडुकराने महिलेच्या हाताला चावा घेतला, जखमी करण्यात आलेल्या तीन घटनांपैकी एक. या घटनेमुळे महिला शेतकरी शेतामध्ये घाबरत शेतकामे करत आहेत.

बटवाडी येथे रानडुकराने केलेल्या हल्ल्यात महिलेचा हात निकामी

Batwadi wild boar attack


एकाच महिण्यातील तिसरी घटना

 केंद्रा बुद्रुक/ सेनगाव (Batwadi wild boar attack) : सेनगाव तालुक्यातील बटवाडी येथे रानडुकराने हौदास घातला असून रान डुकराने आत्तापर्यंत तीन व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून जखमी केले आहे यामध्ये माजी सरपंच लिंबाजी मोरे यांच्यावर पंधरा दिवसांपूर्वी रानडुकराने त्यांच्या मांडीला चावा घेतला होता तर त्यानंतर आठ दिवसापुर्वीच नामदेव झाडे  यांच्यावर देखील पोटावर रानडुकराने गंभीर दुखापत केली होती आणि आता दिनांक 28 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सारूबाई सावजी झाडे ह्या शेताकडे गेल्या असता  अचानक रान डुक्कर  पाटामधून वर येऊन या महिलेच्या हाताला चावा घेतला हा चावा इतका जबर होता की उपचारा दरम्यान कोपरापासून पूर्णतः हात तोडून काढावा लागला सध्या त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असून उजव्या हाताला चावा घेतल्याने महिलेवर मोठे संकट कोसळले आहे भटवाडी येथील सरपंच नामदेव झाडे यांच्या त्या आई होत. 

 या (Batwadi wild boar attack) रानडुकराने अनेकांना सळो की पळो करून सोडले असून या रानडुकराचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ मधून जोर धरू लागली आहे तसेच सध्या शेतीची कामे जोरात असून शेतामध्ये जाणे देखील अवघड झाले असल्याने शेतकरी शेतामध्ये घाबरत  घाबरत जात आहेत.एकंदर बटवाडी येथील एका महिन्यातील ही तिसरी घटना असून रानडुकराने आत्तापर्यंत तिघांना गंभीर जखमी केले आहे तेव्हा संबंधित विभागाने याची दखल घेऊन रानडुकराचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून होत आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026