संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. विठ्ठल उर्फ श्री महाराज देहूकर यांचे निधन

संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. विठ्ठल उर्फ श्री महाराज देहूकर (वय ६३) यांचे पंढरपूर येथे अल्प आजाराने निधन झाले.

संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. विठ्ठल उर्फ श्री महाराज देहूकर यांचे निधन

Warkari Sampraday

पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटात शासकीय व परंपरेनुसार अंत्यसंस्कार

पंढरपूर (Warkari Sampraday) : संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. विठ्ठल उर्फ श्री महाराज देहूकर (वय ६३) यांचे पंढरपूर येथे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वारकरी संप्रदायात मोलाचे योगदान देणाऱ्या श्री महाराज देहूकर यांच्यावर गुरुवारी (२१ मे) सकाळी ७ वाजता पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात शासकीय व परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांनी मागील ३० हून अधिक वर्षे प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. त्यांच्या प्रभावी कीर्तनशैलीमुळे ते राज्यभरात परिचित होते. महाविद्यालयीन जीवनात ते मल्लखांबचे दिग्गज खेळाडू होते. अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेत त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता, अशी माहिती समोर आली आहे. ते पंढरपूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन आणि प्राध्यापक बाळासाहेब देहूकर यांचे धाकटे बंधू होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026