मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर

वसमत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदावर आशुतोष चिंचाळकर यांची नियुक्ती 

Ashutosh Chinchalkar: वसमत नगरपालिकेत आशुतोष चिंचाळकर यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ति झाली. त्याने शहरातील विकास योजनांवर काम करण्याचा निर्णय घेतला, वसुनीचा पाणी पुरवठा

वसमत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदावर आशुतोष चिंचाळकर यांची नियुक्ती 

Ashutosh Chinchalkar


धडाकेबाज अधिकारी आल्याने अनेक विकासाचे प्रकल्प लागणार मार्गी

वसमत (Ashutosh Chinchalkar) :  नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी विकास कामांना चालना देणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांची नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. पूर्णवेळ व कर्तव्यदक्ष धडाकेबाज मुख्याधिकारी वसमत शहराला लाभल्याने वसमतनगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विकासाच्या प्रकल्पाला गती येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकात आनंदाचे वातावरण आहे.

नगर विकास विभागाने मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश व नियुक्तीचे आदेश काढले आहेत. यामध्ये वसमत नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी शेख रफिक कंकर यांची वसमत येथून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी मुख्याधिकारी म्हणून बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर येथील मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर (Ashutosh Chinchalkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 18 जून रोजी ते वसमत नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे वृत्त आहे.

वसमत नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव असलेले मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर (Ashutosh Chinchalkar) हे कर्तव्यदक्ष व धडाकेबाज अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. शहराच्या विकासाच्या विविध योजना व प्रकल्प त्यांनी त्यांच्या काळात राबवले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळे शहरातील विकास कामांना गती मिळणार आहे. कणखर मुख्याधिकारी  लाभल्याने पाणी, स्वच्छता, लाईट यासारख्या मूलभूत सुविधा याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष राहील यात शंका नाही.

वसमत शहरात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या योजनेत त्यांचा मोठा हातभार आहे पाणीपुरवठा योजना शहरातील विविध भागातील रस्ते व नियोजित प्रकल्प यांना आगामी काळात गती मिळणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्व सामान्य नागरिक कर्मचारी वर्गातून स्वागत होत आहे.

संबंधित सामग्री

पूल खचला प्रकरणी ना. नितीन गडकरींकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

पूल खचला प्रकरणी ना. नितीन गडकरींकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Asoda Flyover Damage Case: राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Aug 06, 2026
परभणी शहरात ११० कोटींच्या विकासकामांना मंजुरी

परभणी शहरात ११० कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Parbhani Development Work: परभणी नगरपालिका विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नागरिकांविरुद्ध मंत्री असलेल्या ११० कोटींच्या विकास योजनेची पहिली मंजुरी..

Jul 21, 2026
हिंगोलीतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

हिंगोलीतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

Hingoli Development Work: नगराध्यक्ष गटनेते श्रीराम बांगर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १६ चे  नगरसेवक श्यामभाऊ कदम यांच्या हस्ते योशोदा नगर परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

Jun 22, 2026
ठेकेदारांचा सरकारला कोल्हापुरी झटका..!

ठेकेदारांचा सरकारला कोल्हापुरी झटका..!

कोल्हापूरातील राज्यव्यापी ठेकेदार अधिवेशनामध्ये ठेकदारांनी मागितले 'मेहनतीचा उचल देणे' आणि 'अधिक लाभ न घेणे', तर आर्थिक संकट व प्रशासनात लाचखोरीचे आरोप उभारण्यात येत आहे. ठेकदारींच्या आर्थिक दबावामुळे ८५०० कोटी रुपये अडकल्याने, ३० टक्के ठेकदारांना दिवाळखोरीचे धोकले आहे.

Jun 19, 2026
मोदींच्या नेतृत्वात देशाचा सर्वांगिण विकास!

मोदींच्या नेतृत्वात देशाचा सर्वांगिण विकास!

MLA Sambhaji Patil Nilangekar: मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर परिषदेत सांगितले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जागतिक स्तरावर उंचावण्यातील कार्यक्रमांचे काळजीपूर्ण परिणाम

Jun 17, 2026