आ. संभाजी पाटील निलंगेकर

मोदींच्या नेतृत्वात देशाचा सर्वांगिण विकास!

MLA Sambhaji Patil Nilangekar: मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर परिषदेत सांगितले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा जागतिक स्तरावर उंचावण्यातील कार्यक्रमांचे काळजीपूर्ण परिणाम

मोदींच्या नेतृत्वात देशाचा सर्वांगिण विकास!

MLA Sambhaji Patil Nilangekar


माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा पत्रकार परिषदेत दावा

लातूर (MLA Sambhaji Patil Nilangekar) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गत बारा वर्षात देशाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली असून या बारा वर्षात भारताची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा उंचाविण्यासह आर्थिक, सामाजिक, पायाभूत आणि सांस्कृतीक क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडवून आणले आहे. त्यामुळे देशाच्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळालेला असून त्यांच्याही जीवनात परिवर्तन घडून आल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला बारा वर्ष पुर्ण झाले असून या कार्यकाळात झालेल्या विविध निर्णयाची व कार्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 4,398 पेक्षा अधिक दिवस देशाचे नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निर्वाचीत पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्तापित केला असल्याची माहिती देऊन माजी मंत्री आ. निलंगेकर म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वात गत 12 वर्षात भारताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधलेली आहे. सुमारे 25 कोटी नागरिकांना गरीब रेषेबाहेर काढण्यात यश आले. 81 कोटी नागरिकांना मोफत अन्न-धान्याचा लाभ देण्यात आला आहे. देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरु करण्याचा निर्णय घेत शेतकर्‍यांना सक्षम बनविण्यासाठी ठोस पाऊले उचलेली होती. महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरु करत लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वालंबी करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. याचा लाभ देशातील 3 कोटी महिलांना झाला असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले.

 आ. निलंगेकर (MLA Sambhaji Patil Nilangekar) म्हणाले की, देशातील चौथा आणि महाराष्ट्रील पहिला रेल्वे बोगी प्रकल्प लातुरात सुरु झालेला असून लवकरच या ठिकाणी प्रत्यक्षात उत्पादन सुरु होईल. 2014 पूर्वी लातूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता आता लातूरला चार राष्ट्रीय महामार्ग मिळाले असून दोन लवकरच सुरु होतील असा विश्वासही यांनी व्यक्त केला.    लातूर जिल्ह्याला आगामी काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकासाचे कामे मंजूर होतील, असे सांगून लवकरच नवीन पाच रेल्वेही लातूरला मिळणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिली.

भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी प्रास्ताविक करताना लातूर शहराला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या विविध लाभांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला शहर जिल्हा सरचिटणीस प्रविण कस्तुरे, संजय गिर, निखील गायकवाड, रागिणी यादव, प्रमोद गुडे यांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

ताओ दाटेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पाहणी समितीने ५ सप्टेंबर, शनिवार रोजी पाहणी केली.

Sep 05, 2026
आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

MLA Savarkar: आमदार सावरकरांनी पांदन शेत रस्त्यांचे रूपांतर डांबरीकरण रस्त्यात करून, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेली समस्या कायम स्वरूपात सोडविल्याने आमदार सावरकरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Aug 30, 2026
अधिकारांविना प्रशासक निष्प्रभ; पातूर तालुक्यातील विकासकामे ठप्प

अधिकारांविना प्रशासक निष्प्रभ; पातूर तालुक्यातील विकासकामे ठप्प

पातूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली.

Aug 14, 2026
कोटगुलमध्ये आमदारांचा ‘गुप्त’ दौरा वादात; ट्रान्सफॉर्मर उद्घाटनावरून संताप, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप

कोटगुलमध्ये आमदारांचा ‘गुप्त’ दौरा वादात; ट्रान्सफॉर्मर उद्घाटनावरून संताप, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा कोरची तालुक्यातील अतिदुर्गम कोटगुल परिसरातील दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.

Aug 07, 2026