उदगीर जुगार छापा

उदगीर शहराजवळ जळकोट रोडवरील 'तीरट' जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मध्यरात्री छापा; ३ लाख ७४ हजार ९०० रु. मुद्देमाल जप्त!

Udgir Gambling Raid 'तीरट' जुगार अड्ड्यावर उदगीर ग्रामीन पोलिसांनी मध्यरात्री छापा करून ३.७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. चार आरोपींना पकडले गेले, तर चौथ्या चारांना जेरबंद, पसार झाले.

उदगीर शहराजवळ जळकोट रोडवरील 'तीरट' जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मध्यरात्री छापा; ३ लाख ७४ हजार ९०० रु. मुद्देमाल जप्त!

Udgir Gambling Raid

 

दोन जण जेरबंद, चार जण पसार; चार दुचाकी, ऑटो, मोबाईलसह रोख रक्कम पोलिसांच्या ताब्यात

उदगीर (Udgir Gambling Raid) : उदगीर शहरालगतच्या जळकोट रोडवरील इंडिया नगर परिसरात सुरू असलेल्या 'तीरट' जुगार अड्ड्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या धडाकेबाज छाप्यात ३ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जुगार व्यवसायाला मोठा हादरा दिला आहे. या कारवाईत दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले, तर चार आरोपी पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

पोलीस शिपाई युवराज बालाजी जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक ४४३/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २८ जून रोजी रात्री जळकोट रोडवरील धन्वंतरी हॉस्पिटलजवळील जागीरदार यांच्या शेतालगत असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. तेथे काही जण पैशांची हारजित लावून 'तीरट' नावाचा जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले.या कारवाईत वसीम दस्तगीर शेख वय २५ हावगीस्वामी मठ चौक, उदगीर
 आणि आमेर बशीर हाश्मी वय ३२, रा. दर्गा चौक, उदगीर यांना ताब्यात घेण्यात आले. 

शकील राजमहम्मद लदाफ, बबलु खाजा सय्यद (दोघे रा. मुसा नगर), खाँजा युसुफ शेख (रा. पिंजार मशिद) आणि आशपाक बारी पटेल (रा. जळकोट रोड) हे पोलीस येताच अंधाराचा गैरफायदा घेत घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.या छाप्यात चार मोटारसायकली, एक ऑटो, तीन मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या (Udgir Gambling Raid) प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार केंद्रे करीत असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई  ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. डी. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.शहरालगत सुरू असलेल्या 'तीरट' जुगार अड्ड्यावर झालेल्या या कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम वेगाने सुरू केली आहे.

संबंधित सामग्री

जळकोट रोडवर भीषण अग्नितांडव; सहा दुकाने जळून खाक! 

जळकोट रोडवर भीषण अग्नितांडव; सहा दुकाने जळून खाक! 

Udgir shop fire: जळकोट रोडवर गुरुवारी सकाळी आग लागून सहा दुकाने जळून गेल्याचे उदगीरमध्ये घटना. उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिल्यावरही तासभर वाघावत्या आगीचा नियंत्रण

Jul 09, 2026
वसमत मध्ये घरफोडी दोन लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला 

वसमत मध्ये घरफोडी दोन लाख 18 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला 

Wasmat burglary case: महाराष्ट्रातील वसमतमध्ये एका घरात चोराविरोधात दोन लाख 18 हजार रुपये आणि 21 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाले आहेत. घरफोडी झालेल्या कुटुंबियाने पोलीसला तक्रार

May 25, 2026