नांदेडात गॅंगवार तिघांची निर्घुण हत्या 

शहरातील डी-मार्ट रस्त्यावर शुक्रवारी उशिरा रात्री दोन गँग आमनेसामने आल्याने झालेल्या रक्तरंजित हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला.

नांदेडात गॅंगवार तिघांची निर्घुण हत्या 

Triple Murder

तिहेरी हत्याकांडामुळे नांदेड शहरात खळबळ

नांदेड (Triple Murder) : शहरातील डी-मार्ट रस्त्यावर शुक्रवारी उशिरा रात्री दोन गँग आमनेसामने आल्याने झालेल्या रक्तरंजित हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलेल्या आणखी एका व्यक्तीची तेथेच हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडामुळे नांदेड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

रुग्णालयात नेल्यानंतरही एकाचा खून; दोन गँगमधील जुना वाद चिघळला

सदा गँग आणि साई लाला गँग यांच्यात मागील अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अर्जितसिंघ उर्फ अजयसिंघ आणि शहाबाज यांच्यात झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी रात्री अर्जित आणि त्याचे मित्र चित्रपट पाहून परतत असताना, शहाबाज व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना गाठले.

यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तलवारी व खंजीरांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अर्जितसिंघ आणि शहाबाज यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तत्काळ विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे अर्जितच्या भावाने हल्ला चढवत अरबाज याची हत्या केली.

घटनास्थळावरून पोलिसांनी तीन दुचाकी, खंजीर व इतर साहित्य जप्त केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकानेही तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026