Teacher Stabbed

टीसी घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला; दोन वर्षांपूर्वीच्या वादातून धक्कादायक प्रकार

शैक्षणिक परिसर हादरवून सोडणारी एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे.

टीसी घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला; दोन वर्षांपूर्वीच्या वादातून धक्कादायक प्रकार

Teacher Stabbed

छत्रपती संभाजीनगरातील शाळेत खळबळ; २०२३ मधील अपयशाचा राग मनात ठेवून ऑनलाइन मागवलेल्या चाकूने हल्ला, शिक्षक उपचाराधीन

छत्रपती संभाजीनगर (Teacher Stabbed) : शैक्षणिक परिसर हादरवून सोडणारी एक गंभीर घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर चाकूने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी टीसी घेण्यासाठी शाळेत आला होता. त्यानंतर तो थेट मुख्याध्यापिकांच्या दालनात गेला. तेथे त्याची भेट त्याचे माजी वर्गशिक्षक विशाल धूशिंग यांच्याशी झाली. सुरुवातीला दोघांमध्ये चर्चा सुरू झाली, मात्र काही वेळातच त्याचे रूपांतर वादात झाले. मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षकांनी विद्यार्थ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही जवळपास अर्धा तास सुरू असलेला वाद शांत होऊ शकला नाही.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये नववीत शिक्षण घेत असताना विशाल धूशिंग हे संबंधित विद्यार्थ्याचे वर्गशिक्षक होते. त्याच वर्षी विद्यार्थी परीक्षेत नापास झाला होता. त्या काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये वादही झाले होते. याच घटनेचा राग मनात ठेवून विद्यार्थ्याने टीसी घेण्यासाठी शाळेत येताना ऑनलाइन मागवलेला चाकू सोबत आणल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

वाद संपल्यानंतर विशाल धूशिंग दालनाबाहेर पडत असताना विद्यार्थ्याने अचानक चाकू काढून त्यांच्यावर हल्ला केला. शिक्षकांना मदत करण्यासाठी धावलेल्या एका व्यक्तीलाही विद्यार्थ्याने चाकूचा धाक दाखवून मागे हटवले. दरम्यान, मुख्याध्यापिकांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला.

हल्ल्यानंतर जखमी शिक्षकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच विद्यार्थ्यांमधील वाढता मानसिक तणाव, दीर्घकाळ मनात राहणारा राग आणि ऑनलाइन माध्यमातून सहज उपलब्ध होणाऱ्या धारदार शस्त्रांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर सहविचार सभा; तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन

कनिष्ठ महाविद्यालयीन संचमान्यतेच्या अडचणींवर महासंघाची बैठक झाली. UDISE+ मधील तांत्रिक त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन मिळाले.

Sep 29, 2026