दारू सेवन मृत्यू

परभणीत अति दारू सेवनामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू

Alcohol Consumption Death: अति दारू सेवन केल्यामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता गंगाखेड शहरातील एमआयडीसी परिसरात उघडकीस

परभणीत अति दारू सेवनामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू

Alcohol Consumption Death

 

एमआयडीसी परिसरात आढळला मृतदेह गंगाखेड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

परभणी/ गंगाखेड (Alcohol Consumption Death) : अति दारू सेवन केल्यामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता गंगाखेड शहरातील एमआयडीसी परिसरात उघडकीस आली.

गंगाखेड शहरातील एमआयडीसी परिसरात मरगळवाडी रस्त्याच्या बाजूच्या जागेत एक अनोळखी इसम बेशुद्धवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाल्याने शुक्रवार २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी, महिला पोलीस नाजमीन पठाण, पो.शि. शिवाजी बोमशेटे आदींनी घटनास्थळी जाऊन अनोळखी इसमास दिपक सपकाळ यांच्या खाजगी रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

या (Alcohol Consumption Death) अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत असतांना मयत इसम हा शहरातील दस्तगीर मोहल्ला येथील रहिवासी राम ज्ञानोबा मुंढे वय ५४ वर्ष हे असल्याचे त्यांचा भाऊ शाम मुंढे यांना समजले व ते दारु पिण्याचे सवयीचे होते तसेच गुरुवार २३ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास राम मुंढे हे घरुन बाहेर गेले व रात्री उशिरापर्यंत ते घरी परत आले नाही. त्यांचा शहरात शोध घेतांना पोलीसांद्वारे  मिळालेल्या माहितीवरून भाऊ राम ज्ञानोबा मुंढे हे मयत झाल्याचे समजल्याने शाम ज्ञानोबा मुंढे वय ४८ वर्ष यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली याचा पुढील तपास सपोउपनि शंकर रेंगे पाटील, पो.शि. प्रदिप रनशूर हे करीत आहे.

संबंधित सामग्री

छतावर वडील, जिन्यावर आई-मुलगी, पलंगाखाली मुलाचा मृतदेह!

छतावर वडील, जिन्यावर आई-मुलगी, पलंगाखाली मुलाचा मृतदेह!

Bangladesh Hindu Family Death: बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये निवृत्त शाळा शिक्षक

Aug 24, 2026
परभणीत उंदराचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

परभणीत उंदराचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

Gangakhed Youth Death: गंगाखेड येथे उंदीर मारायचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही (Gangakhed Youth Death) घटना सोमवार सकाळी घडली.

Aug 10, 2026
रोवणीचे काम आटोपून तलावात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा  बुडून मृत्यू

रोवणीचे काम आटोपून तलावात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा  बुडून मृत्यू

Khedegaon Youth Death: धानोरी येथील पंकज दिलीप वाटगुरे (वय अंदाजे २५ वर्ष )या युवकाचा गावाशेजारील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

Aug 02, 2026
काळजाचा थरकाप! ई-रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत; नवरगाव येथील घटना

काळजाचा थरकाप! ई-रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत; नवरगाव येथील घटना

Sindewahi Little Girl Death : घराशेजारील रस्त्याच्या कडेला खेळत असताना एका मालवाहक ई-रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेत अडीच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना

Jul 19, 2026
लेह-लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; वाशिम जिल्ह्यातील दोन तरुण वकिलांचा जागीच मृत्यू!

लेह-लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; वाशिम जिल्ह्यातील दोन तरुण वकिलांचा जागीच मृत्यू!

Washim Lawyers Death: लेह-लडाख पर्यटनासाठी गेलेल्या वाशिम जिल्ह्यातील दोन तरुण वकिलांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू, या अपघातात रिसोड येथील अँड. कुणाल संतोष चोपडे आणि कारंजा येथील अँड. राघव देशपांडे

Jul 14, 2026