ग्राम पंचायतीचे सीसीटीव्हीही हटवले
वसमत (Statue Controversy) : तालुक्यातील वाखारी येथे शासकीय जागेवर अतिक्रमण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवाना अनधिकृतपणे उभारल्याप्रकरणी ५५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुतळा उभारणीदरम्यान ग्रामपंचायतीने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाखारी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेजवळील जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेवर काही व्यक्तींनी अतिक्रमण करत गुरुवारी पहाटे ४ ते सकाळी ६ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुमारे ८ ते १० फूट उंचीचा पुतळा उभारला. ही उभारणी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता करण्यात आली. याशिवाय पुतळ्यासाठी कोणताही सुरक्षित कठडा बांधण्यात आलेला नव्हता.
या ठिकाणी ग्रामपंचायतीने बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा काढून टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे. तसेच संबंधितांनी शासकीय आदेशांचे पालन न करता जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी काशीनाथ भंडारे यांनी गुरुवारी रात्री वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुरेश सचिनानंद बर्वे, विशाल श्रीरंग ढोरे, उद्धव देविदास ढोरे, शाम शंकर ढोरे, आदीनाथ नागोराव ढोरे, किशोर देवराव ढोरे, गजानन लोभाजी बर्वे, कपील काशीनाथ ढोरे, आदीनाथ रावसाहेब ढोरे, आदीनाथ नागोराव ढोरे, शाम तातेराव ढोरे, बळीराम एकनाथ ढोरे, मारोती बाबुराव ढोरे, रावसाहेब नामदेव ढोरे, विनायक गंगाप्रसाद ढोरे, मुंजाजी नारायण ढोरे, नवनाथ संभाजी ढोरे, बळीराम एकनाथ ढोरे, गंगाप्रसाद सुभाषराव बर्वे, रामराव शिवाजी ढोरे, भानुदास भिमराव ढोरे, माधवराव बापुराव ढोरे, विनोद गंगाप्रसाद ढोरे, विश्वभर बापुराव ढोरे, नागोराव उत्तमराव ढोरे, काशीनाथ कामाजी ढोरे, विजय तातेराव ढोरे, नवनाथ रामराव ढोरे, गजानन नामदेव ढोरे, वैभव लालबाजी ढोरे, माधव शंकर ढोरे, नितीन रुखमाजी ढोरे, रामराव मादवराव ढोरे, सुग्रीव रामराव ढोरे, धनंजय बबनराव ढोरे, डिगांबर हरी माने, नरहरी धोंडीबा बर्वे, गणेश नरहरी आलोने, अक्षय माणीकराव अंभोरे, विठ्ठलराव पांडुरंग अंभोरे, गणेश प्रभाकर मुळे, बालाजी गंगाराम ढोरे, सुनिल व्यंकटी ढोरे, मुंजाजी तुकाराम ढोरे, गंगाप्रसाद मारोतराव ढोरे, विकास संभाजीराव ढोरे, सतीष त्र्यंबकराव बर्वे, सुनिल संजय ढोरे, आकाश डिगांबर बर्वे, मुंजाजी नारायण ढोरे, नवनाथ काशीनाथ बर्वे, रामप्रसाद पुरभाजी ढोरे, सोपान बाबुराव ढोरे, सुरेश सुदाम ढोरे, बबन दुलबाजी ढोरे व इतर रहिवासी वाखारी (ता. वसमत) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एकनाथ डक हे करत आहेत.