Ethanol production plant: बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद बु. शेत शिवारात वैशाली बायोफ्युएल कंपनीचा धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा कारखाना आहे. कारखान्यातून निघणारे दूषित पाणी नदीपात्रात
आमदार मिटकरी, स्वीय सहायक,सरपंच पोलीस पाटील व वृत्ताकनकरणाऱ्या प्रतिनिधीवर गुन्हे दाखल
बार्शीटाकळी (Ethanol production plant) : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिसांनीदोनदबु. च्या वैशाली बायोफ्युएल कंपनीच्या संचालकांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार विधान परिषदेचे माजी आमदार, स्वीय सहाय्यक, सरपंच, पोलीस पाटील व देशोन्नतीच्या प्रतिनिधीवर गुन्हे दाखल केल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटने संदर्भात पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद बु.शेत शिवारात शेत गट नं. 31 32 या जागेवर वैशाली बायोफ्युएल कंपनीचा धान्यापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol production plant) करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यातून निघणारे दूषित पाणी नदीपात्रात व शेतकऱ्यांच्या शिवारात बेकायदेशीरपणे सोडत असल्याने व कारखान्याचे चिमणीतून निघणाऱ्या धूर व ध्रुवीकणामुळे शेती, शेतातील पिके व जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी या भागातील जनतेने जिल्हा प्रशासनाकडे व विधान परिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी व प्रशासनाकडे यांच्याकडे काही दिवसापूर्वी करण्यात आल्या होत्या.
दिनांक 14 जुलैला अकोला जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सीमा झावरे यांच्या उपस्थितीतआमदार अमोल मिटकरी , या भागातील सरपंच व जनता यांनी या कारखान्याला भेट देऊन पाहणी केली होती. सदर घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी दत्तात्रय भटकर हे सुद्धा उपस्थित होते. याबाबत दैनिक देशोन्नती मध्ये दिनांक 15 व 16 व 19जुलैला वृत्त प्रकाशित झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कंपनीच्या संचालककअड. वैशाली वालचाळे यांनी दिनांक 21 जुलैला दिलेल्या जबानी रिपोर्ट मध्ये ,माजीआमदार अमोल मिटकरी, यांनी कोणताही बेकायदेशीर अधिकार नसताना बेकायदेशिरपणे जमावगोळा करून उद्योग परिसरात प्रवेश करून उद्योगावर दबावटाकणे, कामकाज बंद पाडणे ,कर्मचाऱ्यांना इजा पोचविणे, भीतीचे वातावरण निर्माण करणे असे कृत्य केल्याचे पिंजर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पिंजर पोलिसांनी कलम 115 (2),189 (2),329 (3),351( 2) नुसार, आरोपीमाजी आमदार अमोल मिटकरी, त्यांचेस्वीय सहाय्यक स्वप्निल ,सागर कावरे सरपंच दोनदखु., कलाबाई अंबादास बोबडे सरपंच दोनदबु. पोलीस पाटील शिवाकावरे, उद्धव कावरे ,मोहन सोनुले ,ज्ञानेश्वर प्रधान, राम सुर्वे, हरी ठाकूर, राहुल कावरे ,जानराव भिवटे, अर्जुन प्रधान, बंडू प्रधान ,ओम सोनुले, भिकाजी बुजवणे ,साईनाथ म्हैसकर, गजानन प्रधान ,प्रवीण प्रधान, तुकाराम नटकुट, गोपाल धुर्वे, मनोहर प्रधान, श्रीराम प्रधान, कृष्ण गावंडे ,कृष्णा भिवटे, विनोद वनखेडे, रणजीत वाहुरवाघ, शुभम प्रधान ,शिवा सोनुले ,अमोल खंडारे ,संदीप गावंडे ,प्रदीप परभे,कैलास लुटुरिया, छाया सोनुले, लता सोनुले ,रेश्मा प्रधान ,गोदाबाई सावळे, मीरा भिवटे ,संगीता प्रधान, शारदा बोबडे, सत्यभामा प्रधान, उषा आइवले ,सरला सुर्वे, मीना भिवटे ,रेखा प्रधान, सीमा प्रधान, जिजाबाई क्षीरसागर, रातनाबाई मोहे,सविता सोनुले, आशा प्रधान, वंदना प्रधान ,ललिता लांडगे, ज्योतीबाई अकोले, बेबीताई नागे ,दत्ता भरणे ,दत्तात्रय भटकर श्री सुर्वे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पिंजर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते बाहेरगावी प्रशिक्षणाला असल्याचे व पिंजर पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केले आहे. कारखाना कडून या परिसरातील जनतेचा श्वास गुदमरण्यासारखे कठीण प्रसंग येत आहेत. या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या दैनिक देशोन्नती वृत्तपत्राच्या प्रतिनिधी वरही कारखाना प्रशासनाकडून गुन्हे दाखल केल्याने जनतेत संतापाची लाट निर्माण झाली असून सदर प्रकरणासंदर्भात जनतेवर व वृत्तपत्राच्या प्रतिनिधीवर दबाव टाकण्याचे केविलवाणेप्रयत्न चालू असल्याच्या उलट सुलट खमंग चर्चा या परिसरात सर्वत्र होत आहेत.
वृत्तांकन करणाऱ्या प्रतिनिधी वर गुन्हे दाखल
या (Ethanol production plant) कारखान्याच्या विरुद्ध या भागातील जनतेने जिल्हा प्रशासनाकडे व काही लोकप्रतिनिधी कडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी जबाबदार खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली होती. या घटनेचे वृत्तांत करण्याकरिता दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी दत्तात्रय भटकर यांनी सुद्धा या कारखान्या संदर्भात दैनिक देशोन्नतीच्या अंकात तीन वेळा वृत्तांत केले आहे. लोकशाहीच्या आधारस्तंभ वर सुद्धा कारखाना प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात सुद्धा संताप व्यक्त केल्या जात असून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय हे या घटनेवरून उघड झाले आहे.