गोरेगाव सोलर प्लँन्ट चोरी

गोरेगाव आजेगाव देवकर वाडी सोलर प्लँन्टवर ४ लाखाची चोरी, ठाण्याला फिर्याद दाखल

Goregaon Solar Plant theft: गोरेगाव, आजेगाव आणि देवकर वाडीतील सोलर प्लँटवर जून महिन्यात तीनदा चोरीच्या घटनांनी एकूण ४ लाख १७५५० रुपयेंचा सामान गेल्याचा नोंदविला आहे.

गोरेगाव आजेगाव देवकर वाडी सोलर प्लँन्टवर ४ लाखाची चोरी, ठाण्याला फिर्याद दाखल

Goregaon Solar Plant theft

गोरेगाव (Goregaon Solar Plant theft) : सेनगांव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव व देवकर वाडी येथील सोलर पॉवर प्लँन्टवर मे व जून महिन्यात सलग चोरीच्या घटना घडल्या असून एकूण ४,१७,५५० रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. या सर्व घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगारांचा शोध पोलीस लावतात की तपासावर पडदा टाकतात, याकडे आता सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पहिली घटना आजेगाव सोलर प्लँन्टवर घडली. ७ मे च्या रात्री ते ८ मे च्या सकाळदरम्यान अज्ञात चोरट्यांनी कॉपर केबल, कनेक्टर आदी ५७,०५० रुपयांचे साहित्य चोरून नेले. पहारेकरी गणेश दतराव बांगर यांच्या फिर्यादीवरून ११ मे रोजी गुन्हा दाखल झाला. दुसरी घटना गोरेगाव सोलर प्लँन्टवर घडली. ६ जूनच्या रात्री ते ७ जूनच्या सकाळच्या अंधारात चोरट्यांनी स्ट्रिंग केबल, डीसी केबल कापून ४०,००० रुपयांचे साहित्य चोरले. इंजिनिअर मंगेश महादेव थोरात यांच्या फिर्यादीवरून १३ जून रोजी गुन्ह्याची नोंद झाली.

तिसरी मोठी घटना देवकर वाडी सोलर पॉवर प्लँन्टवर १७ जूनच्या रात्री घडली. पहारेकरी दत्ता भगवान शिंदे व भगवान पातळे यांनी रात्री दोन वाजेपर्यंत गस्त घातली. पहाटे चार वाजता पुन्हा गस्तीवर गेले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ साईड इंजिनिअर वशीम हकीम शहा यांना कळविले. पाहणी केली असता केबल, निगेटिव्ह कनेक्टर, वाय कनेक्टर मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याचे दिसले. या चोरीत ३,२०,५०० रुपयांचे साहित्य गेले असून दत्ता भगवान शिंदे यांच्या फिर्यादीवरून नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

या (Goregaon Solar Plant theft) तीनही घटनांमध्ये एकूण ४,१७,५५० रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. याशिवाय आजेगाव प्लँन्टच्या २ व गोरेगाव प्लँन्टच्या १ चोरीची नोंद न केल्याचेही समजते. गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे चित्र आहे. पोलीस नियंत्रणाअभावी चोरट्यांचे मनोबल वाढत असून किरकोळ चोऱ्यांच्या फिर्यादी नोंदवण्यास नागरिक धजावत नाहीत. त्याचा फायदा चोरटे घेत आहेत. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे सराईत चोरट्यांचा धुमाकूळ पोलिसांसमोर आव्हान उभे करत आहे. पोलिसांचे दुर्लक्ष याला कारण आहे का, असा सवाल उपस्थित होत असून पोलीस चोरट्यांचा शोध लावतात की प्रकरण दडपतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal sand transportation: सेनगावात मध्यरात्री धडका करण्यात आली, दोन टिप्परांमध्ये एकूण २४.२४ लाखांचा रेतीचा मुद्देमाल जप्त झाला; आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल होईल.

Jul 05, 2026
परभणीत एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीला चिखल लावून चोरट्यांचा डाव यशस्वी

परभणीत एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीला चिखल लावून चोरट्यांचा डाव यशस्वी

UCO Bank ATM: नव्या मोंढा एटीएमवर सीसीटीवी कॅमेरावर चिखल फोडून रोकड लंपास करणारे गुन्हेगार दिशा बदलण्याच्या साठी चालू केले. युको बँकेच्या ५ लाख ५६ हजार रोप्यांची चोरी झालेली घटना परभणीत भेटलेली.

Jul 01, 2026