युको बँक एटीएम

परभणीत एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीला चिखल लावून चोरट्यांचा डाव यशस्वी

UCO Bank ATM: नव्या मोंढा एटीएमवर सीसीटीवी कॅमेरावर चिखल फोडून रोकड लंपास करणारे गुन्हेगार दिशा बदलण्याच्या साठी चालू केले. युको बँकेच्या ५ लाख ५६ हजार रोप्यांची चोरी झालेली घटना परभणीत भेटलेली.

परभणीत एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीला चिखल लावून चोरट्यांचा डाव यशस्वी

UCO Bank ATM

नजर ठेवत चोरी केल्याचा पोलिसाचा संशय 

नवा मोंढा येथील युको बँकेच्या एटीएमवर पहाटे धाडसी चोरी; कोतवाली पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी (UCO Bank ATM) : शहरातील नवा मोंढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी युको बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घुसून सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चिखल लावत त्याची दिशा बदलली. त्यानंतर एटीएम मशीनची तोडफोड करून तब्बल ५ लाख ५६ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

परभणी शहरातील नवा मोंढा परिसरातील पुरोहित भवन येथे असलेल्या युको बँकेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी करत तब्बल ५ लाख ५६ हजार १०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी (१ जुलै) पहाटे ३.०८ ते ३.३६ वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी प्रथम एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिखल फासला व कॅमेऱ्याची दिशा बदलली. त्यानंतर एटीएम मशीनची तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करून मशीनमधील रोकड चोरून नेली. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी युको बँकेचे नवा मोंढा शाखा व्यवस्थापक अरविंद कुमार पांडेय यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक ३५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३२४(४) सह विविध कलमान्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माजीद शेख यांच्याकडे सोपविण्यात आला असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित सामग्री

घरफोडीनंतर चोरट्यांचा एटीएमकडे वळविला मोर्चा

घरफोडीनंतर चोरट्यांचा एटीएमकडे वळविला मोर्चा

Hingoli ATM Robbery: चोरट्यांनी तर आता एटीएम केंद्रावर लक्ष केंद्रीत केले असुन शिवाजी नगर भागातील भर रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Aug 13, 2026
परभणीतील इको बँक एटीएम चोरीप्रकरण; चोरटा स्थागुशाच्या ताब्यात 

परभणीतील इको बँक एटीएम चोरीप्रकरण; चोरटा स्थागुशाच्या ताब्यात 

Eco Bank ATM Theft: परभणीत इको बँक एटिम चोराचा १८ जुलै रोजीचा आरोपी पुनमसिंग टाक (३९ वर्ष) जप्त करण्यात आला. त्या आरोपीने ₹57,500चे मुद्देमाल आणि दोन दुचाकी

Jul 19, 2026
रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal sand transportation: सेनगावात मध्यरात्री धडका करण्यात आली, दोन टिप्परांमध्ये एकूण २४.२४ लाखांचा रेतीचा मुद्देमाल जप्त झाला; आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल होईल.

Jul 05, 2026
अंबेजोगाईत एटीएम फोडीचा प्रयत्न करणारे चोरटे परभणी पोलिसांच्या ताब्यात

अंबेजोगाईत एटीएम फोडीचा प्रयत्न करणारे चोरटे परभणी पोलिसांच्या ताब्यात

शहरातील नवा मोंढा परिसरात झालेल्या एटीएम फोडीच्या घटनेचा तपास करत असताना परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबेजोगाई येथे झालेल्या एटीएम फोडीच्या प्रयत्नातील चार चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.

Jul 04, 2026
गोरेगाव आजेगाव देवकर वाडी सोलर प्लँन्टवर ४ लाखाची चोरी, ठाण्याला फिर्याद दाखल

गोरेगाव आजेगाव देवकर वाडी सोलर प्लँन्टवर ४ लाखाची चोरी, ठाण्याला फिर्याद दाखल

Goregaon Solar Plant theft: गोरेगाव, आजेगाव आणि देवकर वाडीतील सोलर प्लँटवर जून महिन्यात तीनदा चोरीच्या घटनांनी एकूण ४ लाख १७५५० रुपयेंचा सामान गेल्याचा नोंदविला आहे.

Jun 21, 2026