छत्रपती संभाजीनगरमध्ये इन्स्टाग्राम ओळखीचा सापळा; उपअभियंत्यावर शोषणाचा गुन्हा

सोशल मीडियावर ओळखी वाढवण्याच्या मोहात एका ३५ वर्षीय विवाहित महिलेला मोठी किंमत मोजावी लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये इन्स्टाग्राम ओळखीचा सापळा; उपअभियंत्यावर शोषणाचा गुन्हा

Social Media Trap

छत्रपती संभाजीनगर (Social Media Trap) : सोशल मीडियावर ओळखी वाढवण्याच्या मोहात एका ३५ वर्षीय विवाहित महिलेला मोठी किंमत मोजावी लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इन्स्टाग्रामवरून संपर्कात आलेल्या एका उपअभियंत्याने प्रेमाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक शोषण केल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणी शहर पोलिसांनी हिंगोली येथे कार्यरत असलेल्या संबंधित उपअभियंत्यावर गुन्हा नोंदवला आहे. आरोपी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) येथे कार्यरत असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२५ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपी आणि पीडित महिला यांची ओळख झाली. सुरुवातीला साधा संवाद असलेले हे नाते हळूहळू जवळिकीपर्यंत पोहोचले. याच दरम्यान आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. १६ जुलै रोजी कॉफी पिण्याच्या निमित्ताने त्याने पीडितेला भेटीस बोलावले. त्यानंतर आलिशान कारमधून फिरवून शहरातील विविध हॉटेल्समध्ये नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे ब्लॅकमेलिंग

पुढे पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने आपला खरा चेहरा दाखवला. त्यांच्यातील खासगी व्हॉट्सॲप चॅट पीडितेच्या पतीला पाठवण्याची धमकी देत तिला गप्प बसण्यास भाग पाडले. तसेच, फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवत त्याने वारंवार मानसिक छळ केला. जुलै ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडित महिलेनं धाडस करून सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित उपअभियंत्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

उच्चशिक्षित आणि जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे गंभीर आरोप समोर आल्याने शासकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा रंगली आहे.

संबंधित सामग्री

मुंबईत सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश; व्यावसायिकाला टार्गेट; महिला क्रिकेटपटूसह तिघांना अटक

मुंबईत सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश; व्यावसायिकाला टार्गेट; महिला क्रिकेटपटूसह तिघांना अटक

पोलिसांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर टी-२० लीगशी संबंधित असलेल्या एका महिला क्रिकेटपटूसह तिचा भाऊ आणि आणखी एका साथीदाराला कथित सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Apr 23, 2026
सुरतमध्ये जिम ट्रेनरकडून विवाहित महिलेवर ब्लॅकमेल;आर्थिक मागणीसह जीवे मारण्याची धमकी

सुरतमध्ये जिम ट्रेनरकडून विवाहित महिलेवर ब्लॅकमेल;आर्थिक मागणीसह जीवे मारण्याची धमकी

गुजरातमधील सुरत शहरात विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी एका जिम ट्रेनरला अटक केली आहे

Apr 15, 2026
अचलपूर-परतवाड्यात प्रेमाच्या आमिषातून तरुणींचे शोषण; व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने खळबळ

अचलपूर-परतवाड्यात प्रेमाच्या आमिषातून तरुणींचे शोषण; व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने खळबळ

अचलपूर-परतवाडा याअचलपूर-परतवाडा या जोडशहरांमध्ये अत्यंत धक्कादायकप्रकार समोर आला आहे.

Apr 14, 2026