श्री शिवाजी विद्यालय

श्री शिवाजी विद्यालय चिखली येथे मोफत छंद शिबिराचा समारोप 

Shri Shivaji Vidyalaya: चिखलीतील श्री शिवाजी विद्यालयात २९ एप्रिल २०२६ रोजी मोफत छंद शिबिराचा समारोप संपन्न झाला, ज्यात विविध खेळ आणि कलांचे प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.

श्री शिवाजी विद्यालय चिखली येथे मोफत छंद शिबिराचा समारोप 

Shri Shivaji Vidyalaya

चिखली (Shri Shivaji Vidyalaya) : श्री शिवाजी विद्यालय चिखली येथे दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मोफत छंद शिबिराचा समारोपय कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. वसंतराव चिंचोले शाळा समिती निमंत्रित सदस्य तथा वसंत प्रभा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा होते. प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे आजिव सदस्य मा. सत्यजित राऊत शाळा समिती सदस्य, डॉक्टर निलेशजी गावंडे स्विकृत नगरसेवक तथा प्राचार्य भास्करराव शिंगणे महाविद्यालय साखरखेर्डा, नगरसेवक डॉक्टर प्रकाश शिंगणे हे होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमांच्या पूजनाने झाली, आरंभी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब यांचे गौरव गीत सादर करण्यात आले. (Shri Shivaji Vidyalaya) उपस्थित मान्यवरांचा प्राचार्य डॉ. अंनतकुमार चेके यांनी शाल व बुके देऊन सत्कार केला. 

बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील एन. एम. एम. एस. परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या अकरा विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छंद शिबिरामध्ये असलेल्या विविध दालनातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले प्रसंगी त्यांचे मार्गदर्शक यांचाही गौरव करण्यात आला. त्यामध्ये योगा व प्राणायाम कक्ष, स्वसंरक्षण कक्ष, लाठीकाठी, जुडो कराटे, पारंपरिक भोवरा, काचेच्या गोटया, शिवकालीन भोवरा यासारखे खेळ, नृत्यकला, हस्तकला, चित्रकला, सौंदर्य कला यासारख्या अनेक दालनातील प्रशिक्षित विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके मान्यवरासमोर सादर करण्यात आली.

मान्यवरांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी आपल्या मनोगतात विद्यालय अशा प्रकारच्या मोफत छंद शिबिराच्या माध्यमातून डॉक्टर भाऊसाहेब दलितमित्र पंढरीनाथ पाटील साहेब स्व. रा. दे. भोंडे सरकार माजी आमदार दलितमित्र संतोषराव पाटील साहेब यांच्या कार्याचे स्मरण या प्रसंगातून केले होते. (Shri Shivaji Vidyalaya) विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार चेके यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांनी मोफत शिबिराच्या माध्यमातून आपल्यातील सुप्त गुणांना चालना देऊन अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक बदलाच्या दिशेने झेप घेत आहे.

डॉ. भाऊसाहेब दलितमित्र पंढरीनाथ पाटील साहेब,स्व.रा.दे.भोंडे सरकार ,माजी आमदार दलितमित्र संतोषराव पाटील यांच्या कार्याची आठवण ठेवून हे मोफत शिबिर ग्रामीण भागातील मुलांसाठी एक पर्वणी ठरली आहे एक चांगला प्रतिसाद या माध्यमातून पालकांचा विद्यालयाच्या प्रगतीसाठी मिळत आहे. अशा भावना व्यक्त केल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये डॉक्टर चिंचोले साहेब यांनी सर्व बक्षीस पात्र विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक शिक्षिका व विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनंतकुमार चेके यांना धन्यवाद दिले. उपस्थितांचे कौतुक केले व विद्यालयाच्या भरभराटी बद्दल समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन कु. मनीषा सोळंकी यांनी केले व आभार कु. स्वाती गाडेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य राजपूत पर्यवेक्षक सावजी शिबिर प्रमुख समिती गजानन वायाळ,कु.धनवे मॅडम, पाटील मॅडम,कु.सोळंकी मॅडम कु.गाडेकर मॅडम व सर्व प्रभारी शिक्षक उपस्थित होते.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

Chikhli Seva Sankalp Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान

Oct 02, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

Chief Officer Prashant Bidkar: चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत जमा केली.

Oct 01, 2026
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

Chikhli Farmers' Crop Loan: खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा

Sep 30, 2026
‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’  गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’ गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

बुलढाण्यात संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील वाद पुन्हा पेटला. ‘बुलढाण्याचा बिहार’ टीकेला गायकवाडांनी चिखलीतील आरोपांसह प्रत्युत्तर दिले.

Sep 30, 2026