जेष्ठ नागरिक संघ स्वच्छता मोहीम

प्राथमिक आरोग्य केंद्रा सामोरील ग्रीन जिम येथे स्वच्छता

Senior Citizens Association:  स्वच्छ व प्रदुषण मुक्त कन्हान शहर या उदात्त हेतुने जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्य माने प्राथमिक आरोग्य केंद्र..

प्राथमिक आरोग्य केंद्रा सामोरील ग्रीन जिम येथे स्वच्छता

Senior Citizens Association

 

जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने

कन्हान (Senior Citizens Association) : "स्वच्छ व प्रदुषण मुक्त कन्हान शहर" या उदात्त हेतुने जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्य माने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान सामोरिल ग्रीन जिम येथे स्वच्छता मोहीम २०२६ अंतर्गत स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. 
         
आज सकाळी ६ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान सामोरिल ग्रीन जिम येथे जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिम राबवुन स्वच्छता करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष राजेन्द्र शेंदरे यांनी संपुर्ण ग्रीन जीम दुरुस्ती व आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन दिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यकत करण्यात आले.

स्वच्छता मोहिमेत नगरपरिषद सफाई कर्मचारी, स्वच्छता समन्वयक मयुर डफरे व ज्येष्ठ नागरिक संघ कन्हान चे नारायण गजभिये, किशोर अरोरा, बालाजी नायर, छगन वानखेडे, तेजपाल वाघमारे, रमाकांत नागपुरे, सुशील कळमकर, पत्रकार मोहम्मद शफीक शेख, प्रभु बावनकर, सोनवणे आणि जागृती जेष्ठ नागरिक संघट ना कन्हान अध्यक्ष बाबुवन घोडमारे, उपाध्यक्ष भगवान लांजेवार, सचिव संजय करंडे, सहसचिव विठ्ठलराव मानकर, कोषाध्यक्ष वि‌ठ्ठलराव बोरकर, सदस्य तारा चंद निंबाळकर, रमेश चव्हाण, दामोधर बंड, मधुकर कुंभलकर, प्रभाकर रूंघे सह नागरिक उपस्थित होते. तसेच नगरसेविका सुश्री रेखा टोहणे यांनी सुद्धा भाग घेतला. नगराध्यक्ष, नगरसेविका, जेष्ठ नागरिक या सर्वां नी स्वच्छता मोहीम सतत सुरू ठेवण्याचे आश्वासन दिल्याबद्दल सर्वांचे स्वागत आणि आभार ज्येष्ठ नागरि क संघाचे सचिव प्रकाश नाईक यांनी व्यक्त केले.

संबंधित सामग्री

रुग्णालयात गुटखा खाऊन आलात? प्रवेश नाकारला जाऊ शकतो; BMCची नवी नियमावली

रुग्णालयात गुटखा खाऊन आलात? प्रवेश नाकारला जाऊ शकतो; BMCची नवी नियमावली

मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Jul 19, 2026
ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसर झाला स्वच्छ व सुंदर

ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकाराने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसर झाला स्वच्छ व सुंदर

शहराला स्वच्छ आणि हरित ठेवण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.

Jul 14, 2026
हिंगोली शहर सुंदर व स्वच्छतेसाठी ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप

हिंगोली शहर सुंदर व स्वच्छतेसाठी ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप

 शहरातील स्वच्छता राखण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

May 11, 2026
तु. का. विद्यालय एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

तु. का. विद्यालय एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातुर येथील एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांनी श्री संत सिदाजी महाराज संस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.

Mar 30, 2026