तु. का. विद्यालय एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातुर येथील एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांनी श्री संत सिदाजी महाराज संस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.

तु. का. विद्यालय एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

NCC Cadets

सिदाजी महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

पातुर (NCC Cadets) : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातुर येथील एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांनी श्री संत सिदाजी महाराज संस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.

श्री संत सिदाजी महाराज संस्थान येथे गेली १३८ वर्षे भागवत सप्ताह व कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सप्ताहाच्या समारोपावेळी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाप्रसादासाठी सुमारे ५५ ते ६० क्विंटल भंडारा वितरित केला जातो, ज्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित राहतात.

मात्र महाप्रसादानंतर परिसरात पत्रावळ्या व उष्ट अन्न मोठ्या प्रमाणात विखुरलेले राहते. दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळसाबाई कावल विद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबवले. संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या संदेशाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने एनसीसी कॅडेट्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सभासद विठ्ठल लोथे, संगीत विशारद विलास राऊत तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.

बेरार एज्युकेशन सोसायटी पातुरचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, सचिव स्नेह प्रभादेवी गहिलोत, विद्यालयाचे प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर. एस. ढेंगे, पर्यवेक्षिका पी. एम. कारस्कर, पर्यवेक्षक एस. आर. मुखाडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्वच्छता अभियानाचे मार्गदर्शन एनसीसी अधिकारी सुभाष इंगळे यांनी केले.

स्वच्छतेचा आदर्श उपक्रम

एनसीसी कॅडेट विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सिदाजी महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवले. महाप्रसादानंतर विखुरलेला कचरा गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या संदेशाने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत असून दरवर्षी हा उपक्रम पातुर शहरात आदर्श ठरत आहे.

संबंधित सामग्री

प्राथमिक आरोग्य केंद्रा सामोरील ग्रीन जिम येथे स्वच्छता

प्राथमिक आरोग्य केंद्रा सामोरील ग्रीन जिम येथे स्वच्छता

Senior Citizens Association:  स्वच्छ व प्रदुषण मुक्त कन्हान शहर या उदात्त हेतुने जेष्ठ नागरिक संघ व जागृती जेष्ठ नागरिक संघटना आणि नगरपरिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्य माने प्राथमिक आरोग्य केंद्र..

Oct 07, 2026
लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad: 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

Sep 01, 2026
सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' रॅली उत्साहात

सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' रॅली उत्साहात

Ghar Ghar Tiranga: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 12 ऑगस्ट रोजी सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालयात 'घर घर तिरंगा' अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले.

Aug 12, 2026
दशनाम गोसावी समाजाचा २ ऑगस्टला लातूरमध्ये 'पंचसूत्री' सोहळा

दशनाम गोसावी समाजाचा २ ऑगस्टला लातूरमध्ये 'पंचसूत्री' सोहळा

Dashnam Gosavi Samaj: दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकास

Jul 28, 2026
आ. राजू नवघरे यांच्या हस्ते कुरुंद्यात ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न

आ. राजू नवघरे यांच्या हस्ते कुरुंद्यात ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न

MLA Raju Navghare: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व, अजित पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह आयोजित केलेल्या  विविध कार्यक्रमाचे उद्घाटक  आ. राजू नवघरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Jul 27, 2026