चाकूने भोसकून रोख रक्कम लुटली; नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

शहरातील जम्मू कॉलनी परिसरात चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वाराला भोसकून रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चाकूने भोसकून रोख रक्कम लुटली; नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

Robbery Case

परभणी (Robbery Case) : शहरातील जम्मू कॉलनी परिसरात चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वाराला भोसकून रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १३ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी १५ मे रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेख मोहसीन यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना त्यांना ओळखीतील शेख आसेफ शेख महेबूब हा दिसला. त्याने हात दाखवून दुचाकी थांबवली आणि गाडीवर बसला. त्यानंतर “तुझ्याजवळ किती पैसे आहेत, ते दे” अशी मागणी त्याने केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने दुचाकी चालकाच्या पाठीत चाकूने भोसकले.

या हल्ल्यानंतर आरोपीने बळजबरीने साडेसहा हजार रुपयांची रोकड काढून घेतली. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. जखमी शेख मोहसीन यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026