मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध दांपत्यावर हल्ला; चाकूचा धाक दाखवून २ लाख ७८ हजारांचे दागिने लंपास

नवा मोंढा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध दांपत्यावर हल्ला; चाकूचा धाक दाखवून २ लाख ७८ हजारांचे दागिने लंपास

Robbery Case

परभणी (Robbery Case) : शहरातील कृषी सारथी कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध दांपत्यास दुचाकीवरून आलेल्या तीन इसमांनी चाकूचा धाक दाखवून तब्बल २ लाख ७८ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवार, २४ एप्रिल रोजी सकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा शिंदे या त्यांच्या पतीसोबत मॉर्निंग वॉकसाठी कृषी सारथी कॉलनी परिसरातील हनुमान मंदिरासमोरील रस्त्यावरून जात होत्या. त्यावेळी समोरून दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने कटरच्या साहाय्याने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने कापून काढले. यामध्ये अंदाजे आठ तोळे सोन्याचे दागिने असून त्यात सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठन (चेन) आणि सहा तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या यांचा समावेश आहे. एकूण २ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

घटनेनंतर आरोपी संत गाडगेबाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने पसार झाले. या प्रकरणी अनुराधा शिंदे यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि कदम करीत आहेत.

पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

शहरात पहाटेच्या वेळी घडलेल्या या धाडसी लुटीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष दहशत पसरली असून पहाटेच्या वेळेत पोलीस गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे आणि शहरातील प्रमुख रस्ते व कॉलनी परिसरात नियमित गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026