मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा: सेनगावात रास्ता रोको

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा: सेनगावात रास्ता रोको

Road Block Protest

हिंगोली- रिसोड राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प, सरकार विरोधात घोषणाबाजी

सेनगाव (Road Block Protest) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सेनगाव शहरात शनिवारी ३० मे रोजी मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे हिंगोली-रिसोड राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्ण अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा व्यक्त केला जात असून सेनगावातही मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टी-पॉइंट येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलन कर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. आंदोलनात शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, मराठा समाजाचे नेते गंगाधर सरकटे, संकेत पठाडे, पांडुरंग देशमुख, जगू गाढवे, करण देशमुख, अभिजित तिडके, ज्ञानेश्वर गाढवे, अमर देशमुख, अंकुश देशमुख, पंढरी गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सेनगाव पोलिसांनी आंदोलनस्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलन शांततेत पार पडले.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026