Road Accident

मसेलीजवळ दुचाकीचा भीषण अपघात; भंडाऱ्यातील चालकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

 भंडाऱ्यावरून कोरचीकडे येत असलेल्या दुचाकीचा मसेलीजवळील तीव्र वळणावर भीषण अपघात होऊन चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मसेलीजवळ दुचाकीचा भीषण अपघात; भंडाऱ्यातील चालकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Road Accident

१०८ रुग्णवाहिकेला विलंब; पिकअपमधून रुग्णालयात हलवले, उपचारादरम्यान मृत्यू

कोरची (Road Accident) : भंडाऱ्यावरून कोरचीकडे येत असलेल्या दुचाकीचा मसेलीजवळील तीव्र वळणावर भीषण अपघात होऊन चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सोबत प्रवास करणारा एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश कारेमोरे (वय ४५, रा. भंडारा) हे दुचाकीने कोरचीकडे येत होते. मसेलीजवळील धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन प्रथम डिव्हायडरवर आदळले आणि त्यानंतर झाडावर जाऊन जोरदार धडकले. या अपघातात कारेमोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, रुग्णवाहिका पोहोचण्यास सुमारे दोन तासांचा विलंब होणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिकांनी पुढाकार घेतला. मसेली येथील वाहनचालक संजू मसराम यांनी पिकअप वाहनाची व्यवस्था केली. युवा कार्यकर्ते प्रशांत कराडे यांच्या मदतीने दोन्ही जखमींना तातडीने कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित बुद्धे यांनी उपचार सुरू केले; मात्र गंभीर जखमी अवस्थेमुळे नितेश कारेमोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रामविलास लोधी (वय ३०, रा. मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी असून त्यांच्या डोक्याला व खांद्याला मार लागला आहे. त्यांच्यावर कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतक नितेश कारेमोरे हे ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित असून त्यांच्या मालकीचे दोन ते तीन ट्रक असल्याची माहिती आहे. मिनी बाजारांसाठी विविध ठिकाणी मालवाहतूक करण्याचे काम ते करत होते. कोरची येथे सुरू असलेल्या मिनी बाजाराशी संबंधित कार्यक्रमासाठी ते भंडाऱ्यावरून कोरचीकडे येत होते. मात्र, कोरचीपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मसेलीजवळच काळाने त्यांना गाठले.

या प्रकरणाचा पुढील तपास कोरची पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
मसेली आश्रमशाळेत सुरक्षेचा फज्जा? मध्यरात्री दोन विद्यार्थिनी आश्रमशाळेबाहेर, सकाळी लागला शोध!

मसेली आश्रमशाळेत सुरक्षेचा फज्जा? मध्यरात्री दोन विद्यार्थिनी आश्रमशाळेबाहेर, सकाळी लागला शोध!

Ashram School Student Missing: आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनांचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे मसेली येथील घटना

Oct 01, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026