औंढा नागनाथ (Revenue Solution Camp) : तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे महसूल विभागांतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” टप्पा-1 अंतर्गत आज शुक्रवारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरास नगराध्यक्ष कपील खंदारे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त रमेश काटकर उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिबिरात तहसीलदार हरीश गाडे व नायब तहसीलदार अनिता कोलगणे उपस्थित होते.
या (Revenue Solution Camp) समाधान शिबिरामध्ये औंढा नागनाथ मंडळातील नागरिकांना मंडळ व तहसील स्तरावर विविध शासकीय सेवा प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये शिधापत्रिका वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र वितरण, सातबारा नोंदी, सातबारा वरील शिवरस्ते नोंदी आदी महसुली कामांचा समावेश होता. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती विभाग आणि इतर विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ नागरिकांना देण्यात आले.
यावेळी उपायुक्त रमेश काटकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरीश गाडे आणि नायब तहसीलदार अनिता कोलगणे यांनी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक कल्याणी हटवार, कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, मंडळ अधिकारी आशा गिते, तलाठी गजानन गुंजकर, विशाखा डोंगरे, जी. एस. मुकीर, भुसावळे, गजानन हजारे, रुपा कळसकर, केशव जगताप, इमरान पठाण, अक्षय कांबळे, वहीद पठाण, नितेश कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात
Revenue Solution Camp: तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे महसूल विभागांतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” टप्पा-1 अंतर्गत आज शुक्रवारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Revenue Solution Camp
संबंधित सामग्री
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चिखलीत यशस्वी
Maharajswa Samadhan Camp: चिखलीत आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'मध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा प्रदान केल्या गेल्या.
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
Collector Yogesh Kumbhejkar: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की, रिसोडमध्ये आयोजित महसूल समाधान शिबिरातून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण