नवनियुक्त विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे महसूल कर्मचारी संघटनेतर्फे स्वागत

छत्रपती संभाजीनगर विभागाच्या महसूल आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर आयएएस अधिकारी जी. श्रीकांत यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला.

नवनियुक्त विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे महसूल कर्मचारी संघटनेतर्फे स्वागत

Revenue Department

संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांनी दिल्या आयुक्ताना शुभेच्छा

नांदेड (Revenue Department) : छत्रपती संभाजीनगर विभागाच्या महसूल आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर आयएएस अधिकारी जी. श्रीकांत यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला. या नियुक्तीबद्दल महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार आणि नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने १८ एप्रिल रोजी त्यांची सदिच्छा भेट घेऊन जंगी स्वागत करण्यात आले.

शनिवारी सकाळी आयुक्तांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना लक्ष्मण नरमवार यांनी विश्वास व्यक्त केला की, जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली विभागाला सक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनाची एक नवी दिशा मिळेल. आपल्या कार्यपद्धतीतून अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद साधण्याला ते प्राधान्य देत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या समस्या केवळ ऐकून न घेता, त्या सोडवण्यासाठी विशेष शिबिरे आणि मोहीम राबवण्याचे आश्वासन आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावेळी दिले. त्यांच्या या संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे महसूल विभाग अधिक बळकट होईल आणि कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशा भावना महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत.या स्वागत सोहळ्याला राज्य कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार,धोड नामदेव, शंकर मगडेवार, धोगडे नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

या भेटीदरम्यान कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने विभागीय चौकशी, पदोन्नती, ज्येष्ठता यादी, कार्यालयीन विनंत्या आणि बदल्या यांसारख्या प्रलंबित विषयांवर आयुक्तांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026