Railway Track

परभणीत रेल्वेसमोर उडी मारून जेसीबी चालक तरुणाची आत्महत्या

रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर उडी मारून एका जेसीबी चालकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (२८ जून) सकाळी सुमारे १० वाजता घडली.

परभणीत रेल्वेसमोर उडी मारून जेसीबी चालक तरुणाची आत्महत्या

Railway Track

गंगाखेड शहरातील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद

परभणी (Railway Track) : गंगाखेड शहरातील यज्ञभूमी, सारडा कॉलनी परिसरातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर उडी मारून एका जेसीबी चालकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (२८ जून) सकाळी सुमारे १० वाजता घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी नगर, गंगाखेड येथील रहिवासी बळीराम अर्जुन इंगळे (वय ३८) हे जेसीबी चालक म्हणून काम करत होते. पत्नीसोबत झालेल्या कौटुंबिक वादानंतर दहा दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्यामुळे ते मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी शहरातील यज्ञभूमी, सारडा कॉलनी परिसरातील रेल्वे रुळावर परळीमार्गे हैदराबादकडे जाणाऱ्या पूर्णा–हैदराबाद रेल्वेसमोर उडी मारली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रेल्वे चालक अरविंदकुमार आणि तेजस तेलंगे यांनी घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिल्यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई परसराम परचेवाड, विठ्ठल हेडे, प्रकाश गिराम तसेच रेल्वे पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. प्रसाद, पोलीस हवालदार रंगनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

परमेश्वर आश्रोबा जाधव यांनी दिलेल्या माहितीनंतर मयताचा भाऊ जगन्नाथ अर्जुन इंगळे घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

याप्रकरणी जगन्नाथ अर्जुन इंगळे (वय २५) यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार रामेश्वर सपकाळ करीत आहेत.

संबंधित सामग्री

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची सामाजिक कार्यकर्ते सचिन दराडे यांनी स्वीकारली जबाबदारी

Hingoli Suicide-affected farmer: दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून इसापूर-रमणा येथील शेतकरी विठ्ठल फकीरा वाढवे यांनी चार दिवसांपूर्वी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

नापिकी व कर्जामुळे विषारी औषध पिऊन शेतकर्‍याची आत्महत्या

Parda Farmer suicide: तालुक्यातील पारडा  येथील ५० वर्षीय अल्पभुधारक शेतकर्‍यावर  बँकेचे कर्ज व कोरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे  त्याने  चिंतेत राहून विषारी औषध पिऊन  आत्महत्या केल्याची घटना

Oct 04, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सुपरनोव्हा सोसायटीत धक्कादायक घटना; ४३व्या मजल्यावरून उडी घेत तरुणाची आत्महत्या

नोएडाच्या सेक्टर-९४ येथील सुपरनोव्हा सोसायटीत गुरुग्रामच्या संभव जैन या तरुणाने ४३व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Oct 03, 2026