Political Crisis

खासदारांनी खाजगी निधीसाठी पक्षांतर केले; जनताच त्यांना धडा शिकवेल – उद्धव ठाकरे

राज्यातील खासदारांनी विकासासाठी निधी मिळत नसल्यामुळे पक्षांतर केलेले नाही. मिळालेला निधीही खर्च करता येत नसल्याचे चित्र आहे.

खासदारांनी खाजगी निधीसाठी पक्षांतर केले; जनताच त्यांना धडा शिकवेल – उद्धव ठाकरे

Political Crisis

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याची कबुली; परभणीत पत्रकार परिषद

परभणी (Political Crisis) : राज्यातील खासदारांनी विकासासाठी निधी मिळत नसल्यामुळे पक्षांतर केलेले नाही. मिळालेला निधीही खर्च करता येत नसल्याचे चित्र आहे. जनतेची कामे न करणाऱ्या खासदारांनी खाजगी स्वार्थासाठी गद्दारी करत पक्षांतर केले, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

राज्यातील 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी या विषयावर भाष्य केले.

यावेळी ठाकरे म्हणाले, "प्रत्येक खासदाराचा हजेरीपट आमच्याकडे आहे. मतदारसंघाच्या कामांसाठी त्यांनी मंत्र्यांची किती वेळा भेट घेतली आणि स्वतःच्या कामांसाठी किती वेळा गेले, याचा संपूर्ण आढावा आमच्याकडे आहे. गद्दारीच्या मुळावर घाव घालण्याचे काम यापुढे केले जाईल. गद्दारी करणाऱ्या खासदारांना मतदारच योग्य वेळी धडा शिकवतील."

राज्यात अस्थिरता वाढली असून पेपरफुटीच्या घटना महाराष्ट्रातच घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती. सध्याचे सरकार कर्जमाफीची भाषा करते. माफी गुन्हेगाराला दिली जाते, तर आम्ही शेतकऱ्यांच्या ऋणात आहोत. शेतकऱ्यांसाठी आणखी चांगले निर्णय घेण्यापूर्वीच आमचे सरकार पाडण्यात आले आणि आज महायुती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे," अशी टीकाही त्यांनी केली.

महायुती सरकार राज्यात केवळ जातीयवाद वाढवून सत्ता टिकवण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महाविकास आघाडीत एकमत नसल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, वरिष्ठ पातळीवर आघाडीत पूर्ण एकमत आहे. मात्र, स्थानिक पातळीवर काही ठिकाणी एकवाक्यता नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. या विषयावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परभणीच्या खासदारांना जनताच उत्तर देईल. तसेच परभणीकरांनी महापौर दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आणि आणखी एका खासदाराने गद्दारी केल्याबद्दल क्षमा मागण्यासाठी आपण परभणीत आलो असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर सय्यद इकबाल यांच्यासह महाविकास आघाडीचे अन्य पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026