नवी मुंबई मध्ये बीट मार्शल पोलिसांची धाडसी कामगिरी; तलावात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले

कळंबोली येथील रोडपाली गणपती विसर्जन तलावात बुडणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचे प्राण वाचवण्यात कळंबोली पोलिसांनी धाडसी कामगिरी केली.

नवी मुंबई मध्ये बीट मार्शल पोलिसांची धाडसी कामगिरी; तलावात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले

Police Bravery

नवी मुंबई (Police Bravery) : कळंबोली येथील रोडपाली गणपती विसर्जन तलावात बुडणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचे प्राण वाचवण्यात कळंबोली पोलिसांनी धाडसी कामगिरी केली. बीट मार्शल पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे बचावकार्य यशस्वी केले.

दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास एका महिलेने तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती कळंबोली पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच बीट मार्शल पोलिस कॉन्स्टेबल आकाश वानखेडे आणि कॉन्स्टेबल सागर माळी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी पोहोचल्यावर महिला पाण्यात बुडत असल्याचे दिसताच कॉन्स्टेबल सागर माळी यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी मारली आणि महिलेचे प्राण वाचवले. त्यानंतर तिला पोलिस वाहनातून तत्काळ आशा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

दरम्यान, सदर महिलेची ओळख अनीता बालाजी नांदे (वय ३५, रा. कळंबोली) अशी झाली असून ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील उपचारासाठी तिला तिच्या भावाच्या उपस्थितीत एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले.

कळंबोली पोलिसांच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026