रोजगार हमी योजना

पातूर तालुक्यात पेव्हर ब्लॉक कामांच्या बिलांना प्राधान्य; भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण

Rojgar Hami Yojana: पातूर तालुक्यातील पेव्हर ब्लॉक कामांच्या बिलांना प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे. विविध महत्वाच्या प्रकल्पांची बिले प्रलंबित असताना ही घाई निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

पातूर तालुक्यात पेव्हर ब्लॉक कामांच्या बिलांना प्राधान्य; भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण

Rojgar Hami Yojana

पातूर (Rojgar Hami Yojana) : तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक कामांच्या बिलांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणामुळे विविध स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी पंचायत समितीमध्ये याच कामांवरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, रोजगार हमी योजनेतील (Rojgar Hami Yojana) 85-15 या तरतुदीनुसार 15 टक्के निधी मजुरीसाठी तर 85 टक्के निधी इतर कामांसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेव्हर ब्लॉकची कामे राबवून त्यांच्या बिलांना प्राधान्याने मंजुरी दिली जात असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, विहीर खोदकाम, घरकुल योजना यांसारखी महत्त्वाची कामे प्रलंबित ठेवून पेव्हर ब्लॉकच्या बिलांची तत्काळ पूर्तता केली जात असल्याचा आरोपही होत आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने सांगितले की, या कामांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा (मलिदा) मिळत असल्यानेच ही घाई केली जात आहे. यासंदर्भात पंचायत समितीपासून जिल्हा परिषद आणि मंत्रालयापर्यंत काही ठेकेदारांनी ‘सेटिंग’ लावल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे पेव्हर ब्लॉकच्या कामांची बिले वेगाने मंजूर होत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या (Rojgar Hami Yojana) संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा तालुक्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

 

 

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
विराट कोहलीला ५ कोटी देऊन आश्रमात आणल्याचा दावा; क्रिकेटपटूच्या प्रवक्त्यांनी आरोप फेटाळले

विराट कोहलीला ५ कोटी देऊन आश्रमात आणल्याचा दावा; क्रिकेटपटूच्या प्रवक्त्यांनी आरोप फेटाळले

फलाहारी महाराजांच्या ५ कोटींच्या दाव्यावर विराट कोहलीच्या प्रवक्त्यांनी आरोप फेटाळले; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाचा वाद पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

प्रेमानंद महाराजांचे आश्रम पुन्हा चर्चेत; मुलगा आणि महिला बेपत्ता...?

Premanand Maharaj Ashram: प्रेमानंद महाराजांच्या राधा केलि कुंज आश्रमाशी संबंधित काही घटनांमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आश्रमात आलेला 17 वर्षीय अनुज चौधरी हा मुलगा बेपत्ता झाल्याचा दावा

Oct 04, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

Sep 29, 2026