चारठाणा तहसील कार्यालय

परभणी शहर आणि चारठाणा येथे अप्पर तहसिल कार्यालय मंजूर

Charthana Tehsil Office: परभणी जिल्ह्यात दोन नवीन अप्पर तहसील काऱ्‍यालयांचा नवीनकरण मंजुरी देण्यात आला. या काऱ्‍यालयांना महसुल कार्यकाजातील सुधारणे आणि समस्यांचे निरोप

परभणी शहर आणि चारठाणा येथे अप्पर तहसिल कार्यालय मंजूर

Charthana Tehsil Office

 

सहसचिव अजित देशमुख यांच्या स्वाक्षरीचे पत्र कामात येणार सुसूत्रता

परभणी (Charthana Tehsil Office) : महसुली कामात होणारी दिरंगाई टाळण्यासाठी तसेच कामात सुसूत्रता आणण्यासाठी नविन अप्पर तहसिलदार कार्यालय निर्मितीस मंजूरी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात परभणी शहर आणि चारठाणा हे दोन नविन अप्पर तहसिल कार्यालये निर्माण होणार आहे. याबाबत शासनाचे सहसचिव अजित देशमुख यांच्या स्वाक्षरीने पत्र काढण्यात आले आहे. 

महसुली कामातील दिरंगाई टाळण्यासाठी तसेच कामात सुसूत्रता आणण्याकरीता अप्पर तहसिलदार हे पद निर्मिती करून अप्पर तहसिल कार्यालय तयार करण्यात आले आहे. परभणी शहर तसेच जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे नविन कार्यालय (Charthana Tehsil Office) होणार आहे. परभणी शहर अप्पर तहसिलदार कार्यालयात परभणी शहर आणि परभणी ग्रामीण महसुल मंडळे आहेत. तर परभणी तहसिलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात झरी, पेडगाव, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी, जांब, टाकळी कुंभकर्ण हे महसुल मंडळे आहेत. चारठाणा येथील अप्पर तहसिलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात चारठाणा, वाघी धा., बाम्हणी हे महसुल मंडळे असणार आहेत.

तहसिलदार कार्यालयाच्या (Charthana Tehsil Office) कार्यक्षेत्रात जिंतूर, आडगाव, बोरी, दुधगाव, सावंगी म्हा. ही महसुल मंडळे असतील. महसुली कामकाज करत असतांना येणार्‍या अडचणी दुर करण्यासाठी नविन कार्यालय, त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. महसुल मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानूसार नविन कार्यालय निर्मिती करण्यात आली आहेत. प्रस्तावित कार्यालयांबाबत कार्यवाही करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांनी पंधरा दिवसांची जाहीर सुचना प्रसिध्दी करून हरकती व सुचना मागवाव्यात. १ जूलैपर्यंत अभिप्राय विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर करावे, असे आदेश दिले आहे. 

बोरीचा प्रस्ताव प्रलंबित
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे तहसिल कार्यालय निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र सदर प्रस्तावाला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. बोरी वासीयांना आणखी काही काळ तहसिल कार्यालयासाठी वाट पाहावी लागणार आहे.

संबंधित सामग्री

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक

Aug 13, 2026
'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

'त्या' प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन चालकांचे निलंबन

Pregnant woman's death case: जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयात वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली

Aug 11, 2026
परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

परभणीत युरियाच्या नावाने ‘काळाबाजार’; होलसेल व्यापार्‍यांकडून ‘लिंकिंग’ची सक्ती...!

Parbhani Urea Black Marketing: युरिया खताची मागणी जास्त असल्याचा गैरफायदा घेत होलसेल व्यापारी लहान विक्रेत्यांना व शेतकर्‍यांना युरियासोबत इतर महागडी खते घेण्याची सक्ती करत आहेत.

Aug 07, 2026
परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल...!

परभणीत एसआयआर मोहिमेत गंगाखेड विधानसभा जिल्ह्यासह मराठवाड्यात अव्वल...!

Gangakhed SIR Campaign: गंगाखेड तालुक्यात निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर कार्यक्रम) मोहिमेत गंगाखेड विधानसभा मतदार संघ..

Aug 05, 2026
पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

PDC Bank: सहकारी बँकेतच्या उपाध्यक्षपदी गेल्या भव्यांवर नाविने अच्याः रामप्रसाद कदम आणि उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा पाटील राझेश यांची बिनविरोध निवड झाली.

Aug 03, 2026