गंगाखेडा तरुण मृत्यू

परभणीतील गंगाखेडातील रस्त्यावरील भेगांनी घेतला तरुणाचा बळी...?

Gangakhed Youth Death: बुधवारी रात्री परभणीतील गंगाखेडपासून जवळच दुचाकीच्या चाकांचे अडकलेले अनियंत्रित वाहन मृत्यू होऊ शकते जखमांना गंभीर असल्याने त्याचे उपचार पाठविले गेले होते.

परभणीतील गंगाखेडातील रस्त्यावरील भेगांनी घेतला तरुणाचा बळी...?

Gangakhed Youth Death

 

भेगात दुचाकीचे चाक अडकून अनियंत्रीत दुचाकी आदळली दुभाजकावर...!

परभणी (Gangakhed Youth Death) : गंगाखेड शहरात रस्त्यामध्ये पडलेल्या भेगात दुचाकीचे चाक गेल्याने वाहन अनियंत्रीत होऊन दुभाजकावर आदळले. यामध्ये २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गंगाखेड शहरातील परभणी रस्त्यावर बुधवार ८ जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशीरा गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगाखेड ते परभणी जाणार्‍या सिमेंट रस्त्यावर जागोजागी भेगा पडल्या आहेत. या भेगा जीवघेण्या ठरत आहेत.

बुधवारी रात्री झालेल्या अपघातात शेख अनिस शेख कालू वय २८ वर्ष, रा. महातपूरी या तरुणाचा मृत्यू झाला. गंगाखेड येथे कामानिमित्त आलेला शेख अनिस हा तरुण मित्र शेख रशीद शेख नवाज याच्या सोबत दुचाका rवरुन महातपूरी गावाकडे जात असताना परळी नाक्या पासून जवळच परभणी रस्त्या वरील पेट्रोलपंप समोर अपघात झाला. दुचाकीचे चाक रस्त्याच्या भेगात अडकल्याने वाहन अनियंत्रीत झाले. त्यानंतर दुचाकी दुभाजकावर आदळली. जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शेख अनिस याला पुढील उपचारासाठी परभणीला पाठविण्यात आले. गुरुवार ९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास शेख अनिसचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचा भाऊ शेख युनूस यांच्या फिर्यादीवरुन दुचाकी चालक शेख रशीद शेख नवाज याच्यावर (Gangakhed Youth Death) अपघाती मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रस्त्यावरील भेगा जीवघेण्या ठरत असून निष्पाप वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026