दुय्यम निबंधक कार्यालय

परभणीत दुय्यम निबंधक कार्यालयालगतच्या खोलीवर कारवाईची मागणी!

Pathri Sub-Registrar Offices: पाथरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयालगत असलेल्या एका खोलीतून कथितपणे अनधिकृत व्यवहार सुरू असून याठिकाणी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप

परभणीत दुय्यम निबंधक कार्यालयालगतच्या खोलीवर कारवाईची मागणी!

Pathri Sub-Registrar Offices

 

अनधिकृत व्यवहार सुरू असल्याचा आरोप

परभणी (Pathri Sub-Registrar Offices) : पाथरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयालगत असलेल्या एका खोलीतून कथितपणे अनधिकृत व्यवहार सुरू असून याठिकाणी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित खोली तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना मागासवर्गीय विभागाचे तालुका प्रमुख दिलीप हिवाळे यांनी प्रशासनास शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

यासंदर्भात त्यांनी शुक्रवार १७ जुलै रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन दिले केले. निवेदनात म्हटले आहे की , पाथरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या (Pathri Sub-Registrar Offices) शेजारील खोलीत संगणक प्रणाली व कार्यालयीन स्वरूपाची व्यवस्था करून तेथील व्यक्ती स्वतःला कार्यालयातील कर्मचारी असल्याचा भास निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून आर्थिक वसुली केली जात असून दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.

तसेच खोटे दस्तऐवज तयार करून नोंदणी व्यवहार होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे . दरम्यान संबंधित खोली तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना ता. प्र. (मा.वि) दिलीप हिवाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

संबंधित सामग्री

परभणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, अंमलदारांचे आंदोलन

परभणीत सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, अंमलदारांचे आंदोलन

Parbhani Retired Police: जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने गुरुवार २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

Aug 20, 2026
गावंडगावात स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना; १२ ऑगस्टला मोर्चाचा इशारा

गावंडगावात स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना; १२ ऑगस्टला मोर्चाचा इशारा

Banjara Samaj Morcha: गावंडगाव येथे बंजारा समाजाचे आराध्यदैवत तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

Aug 09, 2026
परभणीत नीट पेपरफुटीप्रकरणी पाथरी बंदला प्रतिसाद!

परभणीत नीट पेपरफुटीप्रकरणी पाथरी बंदला प्रतिसाद!

Pathri Bandh: पाथरी तालुक्यात दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी, लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाथरी बंद

Jul 23, 2026
नांदेडच्या 'डॉक्टर लाईन' परिसरात वाहतूक कोंडीचा तीव्र विळखा...

नांदेडच्या 'डॉक्टर लाईन' परिसरात वाहतूक कोंडीचा तीव्र विळखा...

Nanded Doctor Line Traffic: शहरातील अत्यंत गजबजलेला आणि महत्त्वाचा परिसर असलेल्या 'डॉक्टर लाईन'मध्ये दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिक, रुग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन

Jul 16, 2026
“उदगीर तालुक्यात २७ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत!”

“उदगीर तालुक्यात २७ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत!”

उदगीर तालुक्यातील थकबाकीदार ६ हजार ६८६ तर नियमित कर्ज परतफेड करणारे २१ हजार १६९ शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले असून, हे सर्व शेतकरी सध्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

Apr 23, 2026