Parbhani Retired Police: जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने गुरुवार २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
परभणी (Parbhani Retired Police) : जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, पोलीस अमलदार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने गुरुवार २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
निवेदनात पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची सूट देऊन पदोन्नती देण्यात यावी व त्याचे लाभ मिळावे. सेवेत असलेल्या अमलदाराप्रमाणे आरोग्य सुविधा द्याव्यात. पोलीस मतदार संघ स्थापन करण्यात यावा. संस्थेसाठी जागा देण्यात यावी. पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्यांना दहा टक्के आरक्षण मिळावे तसेच सेवेतील व सेवा निवृत्ती झालेल्या अमलदाराचे पाल्यांना पोलीस बॉईज प्रमाणपत्र देण्यात यावे. अशा मागण्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पोलीस आमदार बहुउद्देशीय विकास संस्था जिल्हाध्यक्ष शिवाजी कोटे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.