शंकरपूर येथे कृषी यांत्रिकीपद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान योजनेंतर्गत यांत्रिकीपद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिकासाठी बियाणे निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.

शंकरपूर येथे कृषी यांत्रिकीपद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक

Paddy Cultivation

कोरेगाव, चोप (Paddy Cultivation) : देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथे नियोजित खरीप हंगाम सन 2026 अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान योजनेंतर्गत यांत्रिकीपद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिकासाठी बियाणे निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.

यावेळी जगन नकटू चंडिकार, शंकर काशीराम गुरनुले, दिलीप केवळराम लांजेवार, यादव बुद्धाची दुपारे, तुला राम मेश्राम आणि महादेव नानाजी बुद्धे यांच्या शेतात पेरणी यंत्राचा वापर करून भात बियाणे पेरणीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

तसेच उपस्थित महिला शेतकऱ्यांना एल निनोच्या वातावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत माहिती देण्यात आली. महसूल मंडळ कार्यालय परिसरात स्थापित करण्यात आलेला स्वयंचलित हवामान संच कसा कार्य करतो, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उप कृषी अधिकारी उमाकांत बोधे (वडसा), सहाय्यक कृषी अधिकारी विजया औरासे (शंकरपूर) तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026
पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

मराठवाड्यात पावसाची तूट असताना नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक झाली. बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर टीका सुरू झाली.

Sep 19, 2026
स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटली; ३८ प्रवासी जखमी, गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील घटना

गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ एसटी बस पलटली.

Sep 18, 2026
महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना ९ प्रमुख मागण्या

महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना ९ प्रमुख मागण्या

शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. शेतकरी मदत, कर्जमाफी, पीकविमा आणि चारा छावण्यांसह ९ मागण्या मांडल्या.

Sep 18, 2026