अनाधिकृत बांधकाम प्रकरण भोवले
वसमत (Vasmat Municipal Council) : वसमत नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केला. यामध्ये काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज अब्दुल रहमान व राष्ट्रवादीचे शेख हबीब शेख बशीर यांचा समावेश आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे दोन ज्येष्ठ नगरसेवक अपात्र ठरले आहेत या प्रकारामुळे वसमत शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वसमत (Vasmat Municipal Council) येथील शेख अजहर शेख मन्नान यांनी काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल हाफिज अब्दुल रहेमान यांनी गैरकायदेशीर बांधकाम केलेले असल्यामुळे त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचे विनंती केली होती.
तर सय्यद मुजीब शेख जानी यांनी तक्रार दिली होती की राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेख हबीब शेख बशीर यांनी अतिक्रमण व अवैध बांधकाम केली असल्याची तक्रार दिली होती
सदरील प्रकरणात जिल्हाधिकारी हिंगोली यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून अहवालाचे अवलोकन करून व कागदोपत्री पुरावे विचारात घेऊन 17 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला आहे.
या आदेशामुळे वसमत शहरात व राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. अब्दुल हाफिज अब्दुल रहमान हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. वसमत नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख हबीब शेख बशीर हे माजी नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नगरपालिकेतील दोन ज्येष्ठ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाल्याने नगरपालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नगरपालिका सदस्यांनी अनधिकृत बांधकाम करणे व अतिक्रमण करणे हे त्यांच्या सदस्यत्व पदासाठी घातक ठरले आहे. आता याप्रकरणी पुढे काय होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही प्रकरणात नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर तक्रार झाली होती. या दोन्ही प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली होती. दरम्यान दोन्ही बाजूचा युक्तिवाद जिल्हाधिकाऱ्याननी ऐकून सोमवारी 17 ऑगस्टला हा निकाल दिला आहे.