वसमत नगर परिषद कारवाई

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

Vasmat Municipal Council Action: नगर परिषदेच्या मालकीच्या 175 चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यानी निर्णायक कारवाई केली आणि नगरपरिषद प्रशासनाने टिनशेड काढून..

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

Vasmat Municipal Council Action

 

नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांची कारवाई

वसमत (Vasmat Municipal Council Action) : नगर परिषदेच्या मालकीच्या 175 चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यानी निर्णायक कारवाई केली आणि नगरपरिषद प्रशासनाने, 30 सप्टेंबर रोजी, सदर जागेवरील टिनशेड काढून जागा ताब्यात घेतली. या कारवाई बद्दल नगरपरिषद प्रशासनाचे स्वागत होत आहे
पंचायत समिती जवळील जागा तात्काळ  रिकामी करण्याची नोटीस नगरपालिकेकडून बजावण्यात आली होती. मात्र, मुदतीत अतिक्रमण न हटविल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई  केली.19 नगरसेवकांनी या संदर्भात तक्रार दिली होती जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होईलअशी भीती व्यक्त करण्यात आली होती. 30 सप्टेंबर  रोजी नगरपरिषद प्रशासनाने 175 चौ.मी. जागेवरील टिनशेड हटवून कारवाई केली. मोकळ्या झालेल्या जागेवर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे वाहन, ट्रॅक्टर आदी वाहने उभी करण्यात आली आहेत.

सदरील जागेचा वाद वसमत मध्ये चर्चेचा विषय झाला होता मुख्याधिकाऱ्यांनी वारंवार पत्र देऊन उभारण्यात आलेले काढून घेण्यात टाळाटाळ होत असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी अखेर नगरपालिकेचे पथक पाठवून कारवाई केली. वसमत नगरपालिकेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे प्रकरण चांगलेच तापले होते. आता या प्रकरणात पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.