हिंगोलीत वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन, 1 मे पासून देखभाल ठप्प

महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात आणि थकित बिलांच्या प्रश्नावरून हिंगोली जिल्हा इलेक्ट्रिकल कंत्राटदार असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हिंगोलीत वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन, 1 मे पासून देखभाल ठप्प

MSEDCL Issue

हिंगोली (MSEDCL Issue): महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात आणि थकित बिलांच्या प्रश्नावरून हिंगोली जिल्हा इलेक्ट्रिकल कंत्राटदार असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 1 मे पासून जिल्ह्यातील वीज देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे बंद करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला असून प्रत्यक्षात कामबंद आंदोलन सुरू झाले आहे. 

असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार महावितरणकडून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले दीर्घ काळापासून थकवण्यात आली आहेत. वारंवार मागणी करूनही बिले मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शिवाय अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बिले तात्काळ द्या आणि अन्यायकारक कारभार थांबवा अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.

या आंदोलनामुळे 1 मे पासून उच्चदाब वाहिनी, लघुदाब वाहिनी तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक व ब्रेकडाऊन कामे पूर्णपणे बंद राहणार आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात वाढलेला वीज वापर आणि वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर देखभाल कामे बंद राहिल्यास नागरिकांना वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. 

हा लढा जनतेच्या सुरक्षेसाठीच असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. थकित बिले न मिळाल्याने दुरुस्ती साहित्य खरेदी करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे. त्यामुळे दर्जेदार काम करणे शक्य होत नाही. वीज व्यवस्था सुरळीत हवी असेल तर महावितरणने तातडीने थकित बिले अदा करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

कंत्राटदारांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले असून हक्कासाठी लढा हीच बांधिलकी असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान महावितरणने यावर तातडीने तोडगा काढावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अन्यथा जिल्ह्यात वीज संकट गडद होण्याची भीती आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

Sep 13, 2026