Milk Adulteration

दूध भेसळ प्रकरणात एफडीएचा मोठा ॲक्शन; मोठ्या डेअरी कंपन्यांची तपासणी सुरू

राज्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या व्यापक मोहिमेचा आवाका आता मोठ्या दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे.

 दूध भेसळ प्रकरणात एफडीएचा मोठा ॲक्शन; मोठ्या डेअरी कंपन्यांची तपासणी सुरू

राज्यभरातील भेसळविरोधी मोहिमेला वेग; कृत्रिम दूध पुरवठा साखळीचा शोध, नव्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू

पुणे : राज्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या व्यापक मोहिमेचा आवाका आता मोठ्या दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे. बुधवारी एफडीएच्या पथकाने इंदापूर आणि मंचर परिसरातील दोन प्रमुख दुग्ध कंपन्यांची सखोल तपासणी करत त्यांच्या दूध खरेदी प्रक्रिया, पुरवठादारांची माहिती आणि गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेची पडताळणी केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या दूध संकलन केंद्रे, चिलिंग सेंटर किंवा इतर संबंधित आस्थापनांकडून या कंपन्या दूध खरेदी करतात का, तसेच भेसळयुक्त दूध पुरवठा करणाऱ्या साखळीशी त्यांचा कोणताही व्यावसायिक संबंध आहे का, याची माहिती गोळा करण्यासाठी ही तपासणी करण्यात आली.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दूध खरेदीची नोंदवही, पुरवठादारांचे तपशील, गुणवत्ता तपासणीची कागदपत्रे आणि उत्पादन प्रक्रियेची छाननी केली. ही तपासणी मोहीम आणखी दोन दिवस सुरू राहणार असून, त्यानंतर उपलब्ध निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

यापूर्वी रविवारी एफडीए आणि पोलिस प्रशासनाने पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यांतील १३ आस्थापनांवर संयुक्त धाडी टाकल्या होत्या. या कारवाईदरम्यान पाणी, स्किम्ड मिल्क पावडर, व्हे (डेअरी परमिएट) पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट किंवा शॅम्पू तसेच पामतेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे कृत्रिम दूध नैसर्गिक दुधात मिसळून बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

कात्रज डेअरीच्या तक्रारींची दोन महिन्यांत चौकशी

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीविरोधातील तक्रारींचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे. विधानपरिषदेत सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबत माहिती देताना, चौकशीचा अहवाल दोन महिन्यांत सादर केला जाईल, असे सांगितले. चौकशीत बोगस दूध संस्था, आर्थिक गैरव्यवहार किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार योगेश टिळेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित केला होता. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, बच्चू कडू आणि अरुण लाड यांनीही चर्चेत सहभाग घेतला. मंत्री सावे यांनी सांगितले की, कात्रज डेअरीसंदर्भातील तक्रार २ जून २०२६ रोजी प्राप्त झाल्यानंतर १० जूनला विभागीय उपनिबंधकांना चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार ११ जून रोजी सहायक निबंधक आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांची द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, आवश्यक वाटल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचाही समितीत समावेश करण्यात येणार आहे.

दूध पुरवठा साखळीसाठी कठोर नियम लागू

राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ, कृत्रिम दूधनिर्मिती तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी एफडीएने राज्यभर कठोर नियम लागू केले आहेत. नव्या आदेशानुसार कच्च्या दुधाच्या प्रत्येक पात्रावर 'कच्चे दूध' असा स्पष्ट उल्लेख करणे आणि 'हे दूध सेवनापूर्वी उकळणे आवश्यक आहे' अशी सूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय पाश्चराइज्ड दूध केवळ सीलबंद, लेबलयुक्त आणि छेडछाड न होणाऱ्या पॅकेजिंगमध्येच विक्रीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहणार आहे. दूध संकलनापासून अंतिम विक्रीपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळीची पडताळणी, शीतसाखळीचे पालन, प्रमाणित अन्न प्रक्रिया उपकरणांचा वापर आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी जारी केलेल्या आदेशानुसार दूध संकलन केंद्रे, डेअऱ्या, प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक तसेच घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना या नव्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026