पळसगाव वनविभाग कारवाई

पळसगाव येथे वनविभागाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा अवैध सागवान साठा जप्त

Palasgaon Forest Action: गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाने मौजा पळसगाव येथे एका घराबाहेर व घरात सुरू असलेल्या अवैध सागवान चिरान व्यवसायावर छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पळसगाव येथे वनविभागाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा अवैध सागवान साठा जप्त

Palasgaon Forest Action


झाशीनगर वनपरिक्षेत्राची मोठी कारवाई; १ संशयित ताब्यात
गुप्त माहितीच्या आधारे घरात व घराबाहेर सुरू असलेल्या अवैध चिरान व्यवसायाचा पर्दाफाश

नवेगावबांध/ गोंदिया (Palasgaon Forest Action) : गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाने मौजा पळसगाव येथे एका घराबाहेर व घरात सुरू असलेल्या अवैध सागवान चिरान व्यवसायावर छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कारवाई २७ जून २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास करण्यात आली, ज्याची सविस्तर चौकशी ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे.

झाशीनगर (वन्यजीव) वनपरिक्षेत्र, बोंडे (बफर) सहवनक्षेत्र आणि धमेदीटोला नियत क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा पळसगाव येथील रहिवासी देवानंद विश्वनाथ शहारे यांच्या घरी अवैध रित्या सागवान लाकडांचे चिरान केले जात असल्याची पक्की माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीवरून विभागीय वन अधिकारी (न.ना.व्या.रा.क्षेत्र साकोली) अतुल देवकर आणि सहाय्यक वनसंरक्षक बालकृष्ण दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर व त्यांच्या चमूने शहारे यांच्या राहत्या घरावर अचानक छापा टाकला.
या छाप्यादरम्यान वनविभागाने ६२ नग सागवान चिरान माल (०.६७४ घ.मी.), १९ नग घरासाठी वापरलेले चौपट (०.४७१ घ.मी.), १०८ नग आडजात फाटे म्हणजेच बल्ल्या (०.७६७ घ.मी.), ६ नग सागवान लाकूड (१.५४९ घ.मी.) यासह १ नग हातआरा आणि १ नग कुऱ्हाड असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या (Palasgaon Forest Action) यशस्वी कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांच्यासह क्षेत्र सहाय्यक (बोंडे बफर) एन. डी. यादव, धमेदीटोला बिट रक्षक के. जी. जायभाये, तसेच वनरक्षक एस. जी. परशुरामकर, के. एफ. नवखरे, कु. एम. पी. केंद्रे, कु. एस. पी. साखरे, व्ही. एल. सयाम, संगणक चालक मंगेश सरजारे आणि वाहन चालक देवानंद नारनवरे या सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. वने ही आपली राष्ट्रीय संपत्ती असून तिचे जतन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे झाशीनगर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत जंगलामध्ये कुठेही अवैध वृक्षतोड, अवैध शिकार किंवा अवैध चराई सारखे प्रकार घडत असल्यास नागरिकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026
वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Vaigaon Person Suicide:  तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

Aug 30, 2026