Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

वायगाव व्यक्ती आत्महत्या

वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Vaigaon Person Suicide:  तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.


वायगावात ५० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Vaigaon Person Suicide |

उदगीर (Vaigaon Person Suicide) : तालुक्यातील वायगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील खोलीच्या स्लॅबच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. दयानंद बाबुराव हुल्ले (वय ५०, रा. वायगाव, ता. उदगीर) असे मयताचे नाव आहे. याबाबत त्यांचे बंधू संजय सुधाकर हुल्ले यांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद हुल्ले यांनी आपल्या राहत्या घरातील एका खोलीत स्लॅबच्या कडीला दोरी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला. दि. २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.२३ वाजता मृतदेहाची नोंद करण्यात आली.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७३/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या आदेशाने पुढील तपास पोलिस हवालदार भिसे करीत आहेत. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

Related to this topic: