मालेवाड्यात आगीचे तांडव;आठ एकरातील मका झाला कोळसा  

भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे आग लागून आठ एकरातील मका पिक पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी उघडकीस आली. 

मालेवाड्यात आगीचे तांडव;आठ एकरातील मका झाला कोळसा  

Maize Crop Damage

आठ ते नऊ लाख रुपयाचे नुकसान

भिवापूर (Maize Crop Damage) : भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे आग लागून आठ एकरातील मका पिक पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी उघडकीस आली. मालेवाडा येथील विलास दयाराम मेश्राम असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी भाडेपट्टीने गावातीलच एका शेतकऱ्याची शेती कसण्यासाठी घेतली होती.

मागील काही वर्षापासून या परिसरात रब्बी हंगामात चना पिकाला बुरशीजन्य आजाराची लागण होत असल्याने यावर्षी विलास दयाराम मेश्राम यांनी नवीन प्रयोग करीत मका पिकाची लागवड केली. पिक जोमात आल्याने सदर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता मात्र आगीत मका पूर्ण त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून प्राथमिक अंदाज आठ ते नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दैनिक देशोन्नतीशी बोलताना पीडित शेतकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आगीचे कारण गुलदस्तात असून काल 14 एप्रिल रोजी या शेतालगतच श्रीकांत इंगोले यांच्या शेतात आग लागली होती त्यामुळे तीच आज मेश्राम यांच्या शेतात लागून मका पीक जळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
 
संबंधित सामग्री

बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाची लूट; प्रति बॅग नुसार अधिकारी पैसे घेतात, रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप 

बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाची लूट; प्रति बॅग नुसार अधिकारी पैसे घेतात, रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप 

Bogus seed case: प्रति बॅग नुसार पैसे घेऊनच विभागातील अधिकारी कारवाई टाळत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Aug 05, 2026
शेतातील इलेक्ट्रिक तारांमध्ये शार्टसर्किट होवून साडेतीन एकरातील मका व ठिबक सिंचन संच,पाईप जळून खाक

शेतातील इलेक्ट्रिक तारांमध्ये शार्टसर्किट होवून साडेतीन एकरातील मका व ठिबक सिंचन संच,पाईप जळून खाक

तालुक्यातील ग्राम देवधाबा येथील शेतातील विद्युततारांमध्ये दि.16 एप्रिल 26 रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान शॉर्टसर्किट झाले.

Apr 17, 2026
कांदा विक्रीसाठी नेताना काळाचा घाला; भीषण अपघातात पातुरच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

कांदा विक्रीसाठी नेताना काळाचा घाला; भीषण अपघातात पातुरच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

 कांदा विक्रीसाठी नाशिकच्या बाजारपेठेकडे जात असताना झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पातुर तालुक्यातील कोसगाव येथील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Apr 04, 2026
एकीकडे युद्धाची धग, दुसरीकडे अवकाळीचा प्रहार; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

एकीकडे युद्धाची धग, दुसरीकडे अवकाळीचा प्रहार; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

राज्यात सध्या निसर्गाचा कहर पाहायला मिळत असून अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Apr 02, 2026
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

जिल्ह्यात मार्च महिन्यात बहुतांश तालुक्यात अवेळी पावसासह गारपीट व वादळी वार्‍यामुळे शेतीपिकांचे व मालमत्तेचे आणि घरांचे टिनपत्रे उडुन नुकसान झाल्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.

Apr 01, 2026