कांदा विक्रीसाठी नेताना काळाचा घाला; भीषण अपघातात पातुरच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

 कांदा विक्रीसाठी नाशिकच्या बाजारपेठेकडे जात असताना झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पातुर तालुक्यातील कोसगाव येथील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कांदा विक्रीसाठी नेताना काळाचा घाला; भीषण अपघातात पातुरच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Farmer Death

(Farmer Death) कांदा विक्रीसाठी नाशिकच्या बाजारपेठेकडे जात असताना झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पातुर तालुक्यातील कोसगाव येथील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिलीप दयाराम करवते (वय ४२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हिंगोली-कळमनुरी मार्गावर घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिलीप करवते हे गुरुवारी (दि. २) आपल्या दोन सहकाऱ्यांसह मालवाहू वाहनाने (क्र. एमएच ३० बीडी ६२७९) कांदा विक्रीसाठी नाशिककडे निघाले होते. त्यांचे वाहन हिंगोलीपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, करवते हे वाहनातून खाली फेकले गेले आणि थेट कंटेनरच्या खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा कंटेनरही घटनास्थळी उलटला.

दिलीप करवते यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. गुरुवारी दुपारी शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कोसगावसह परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शासनाने या शेतकरी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026