महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी दिलेल्या गाड्यांचा सर्रास गैरवापर

Maharashtra ST Corporation: महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूकीविरूद्ध लढण्यासाठी गाड्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने केला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी दिलेल्या गाड्यांचा सर्रास गैरवापर

Maharashtra ST Corporation

महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचा आरोप

लातूर (Maharashtra ST Corporation) : राज्यातील अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी आदेश दिले असले तरी त्यांचे आदेश आर. टी. ओ. व एसटी या दोन्ही विभागांनी अद्याप गंभीर घेतलेले दिसत नसून एस.टी. महामंडळाकडून अवैध वाहतूक रोखण्यासाठी दिलेल्या गाड्यांचा आर. टी. ओ अधिकाऱ्यांकडून सर्रास गैरवापर होत असून त्याला अभय देण्याचे काम एस.टी.चे काही अधिकारी करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत अवैध वाहतूक रोखण्यासाठी स्पष्ट आणि कठोर निर्देश दिले होते. मात्र, त्या सूचनांची स्थानिक स्तरावर  अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र असून राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांपैकी केवळ २० कार्यालयांनाच एसटीकडून वाहन व चालक तसेच एक पर्यवेक्षक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही वाहने प्रत्यक्ष कारवाई ऐवजी काही ठिकाणी आर. टी. ओ. अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरली जात असल्याचे वास्तव उघडकीस आले असून त्याला एस.टी. अधिकाऱ्यांकडून अभय दिले जात असून दोघांच्या संगनमताने राजरोसपणे हे सुरू असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

एसटीचे काही अधिकारी व पर्यवेक्षक केवळ नावापुरती उपस्थिती लावून कारवाईचा दिखावा करत असून अवैध वाहतूकी संदर्भात केलेल्या कारवाईची माहिती मिळावी यासाठी महामंडळाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे केलेल्या कारवाईचे फोटो व लेखी माहितीही (Maharashtra ST Corporation) एस.टी.च्या अनेक विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या मुख्य कार्यालयात सादर केलेली नाही. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या मागील काही महिन्यांतील कामगिरीची चौकशी केल्यास अवैध वाहतूक रोखण्यासाठी एस.टी. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील बेकायदेशीर मार्ग व वाहनांची माहिती आर. टी .ओ. ला देणे अपेक्षित असताना, त्यातही मोठ्या प्रमाणावर निष्क्रियता दिसून येत आहे. दुसरीकडे, आर.टी. ओ अधिकारी सुद्धा केवळ वरवरची कारवाई करून एस.टी.ने दिलेल्या संसाधनांचा व मनुष्यबळाचा गैरवापर करत असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

संबंधित सामग्री

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026