महाबीज बियाणे कोटा

महाबिजने प्रमाणित बियाण्याचा कोटा वाढवावा; विनायक सरनाईक यांची मागणी आंदोलनाचा इशारा...

Mahabeez Seed Storage: महाबीजने सोयाबीन बीजोत्पादन कोटा 60% कमी करून शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाबीज संचालकांना निवेदन केले

महाबिजने प्रमाणित बियाण्याचा कोटा वाढवावा; विनायक सरनाईक यांची मागणी आंदोलनाचा इशारा...

Mahabeez Seed Storage

चिखली (Mahabeez Seed Storage) : सोयाबीन बीजोत्पादनात राज्यात अग्रेसर असलेल्या चिखली तालुक्याचा बीजोत्पादन कोटा महाबीजने खरीप 2026 साठी सन 2025 म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत घटवल्याने चिखली तालुक्यातील बीजोत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या पिकवणाऱ्यालाच जर विनवन्या कराव्या लागत असल्याने या अन्यायाविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी सदस्य विनायक सरनाईक यांनी दि 03/06/2026 रोजी महाबीज व्यवस्थापकीय संचालक अकोला यांना निवेदन दिले असुन महाबिजने प्रमाणित व पायाभुत बियाणे मुबलक प्रमाणात द्यावे अशी मागणी केली आहे.मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. 

खरीप 2025 मध्ये चिखली तालुक्यासाठी 9,853 हेक्टर बीजोत्पादनाचे लक्ष्यांक होता. मात्र खरीप 2026 साठी (Mahabeez Seed Storage) महाबीजने सोयाबीन बियाणेचा हा कोटा केवळ 985 हेक्टर इतकाच निश्चित केला आहे. म्हणजेच 60 %कपात करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्याचा कोटा सुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत महाबिजने कमी केला आहे. 

"चिखली तालुका बीजोत्पादनात अव्वल असूनही त्या शेतकऱ्यांवरच अन्याय का? सध्या सोयाबीनचे बाजारभाव चांगले असूनही, महाबीजला बियाणे देऊन आम्ही शेतकऱ्यांनी चूक केली का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याने याबाबतचा संताप देखील सरनाईक यांनी व्यक्त केला.क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे सरनाईक यांनी महाबिजचे व्यवस्थापकीय संचालक अकोला त्याचप्रमाणे जिल्हा व्यवस्थापक बुलढाणा यांना निवेदन दिले असून चिखली तालुक्याचा सोयाबीन बीजोत्पादन कोटा 9,853 हेक्टर इतका पूर्ववत करण्यात यावा.

बीजोत्पादक शेतकऱ्यांना पायाभूत व प्रमाणित बियाण्याचा पुरेसा साठा तात्काळ वाढवून देण्यात यावा,फाउंडेशन बियाण्याअभावी पेरणीवर परिणाम होऊ नये म्हणून राखीव साठ्यातून बियाणे वितरित करण्यात यावे,महा-डीबीटी वर अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वेळेत मिळेल यासाठी उपाययोजना करण्यात येवून कृषी विभागाला मागणीनुसार बियाणे पुरवठा करण्यात यावा,महाबीजकडे बियाणे साठा नसल्यास स्थानिक FPC कडून प्रमाणित बियाणे उपलब्ध करून द्यावे. पेरणी तोंडावर आली असल्याने तातडीने बियाणे वाटपास देखील सुरुवात करण्यात यावी,मागील वर्षीप्रमाणे यावर्षी गोंधळ निर्माण होणार नाही यासाठी किलोचा फॉर्मीला न वापरता बॅगचा फॉर्मुल्याचा वापर करावा शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा,महाबिज अकोला व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहे.

मागण्यांची पुर्तता न झाल्यास सरनाईक यांचा आंदोलनाचा इशारा:

"महाबीज ही शेतकऱ्यांची संस्था आहे. बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच बियाणे मिळाले नाही, तर नाईलाजास्तव शेतकऱ्यांसह महाबीज कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील," असा स्पष्ट इशारा सरनाईक यांनी  दिला आहे.

महा डीबीटी वरील अर्जदार शेतकऱ्यांसाठी बियाणे उपलब्ध करून द्या...

महाडीबीटी' पोर्टलवर सोयाबीन बियाण्यासाठी अर्जांचा पाऊस पडल्याने हजारो शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. चिखली तालुक्यातच लक्ष्यांकापेक्षा 60 शेतकरी गटांचे अतिरिक्त अर्ज आले असून,हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन वयक्तीक अर्ज केले आहेत.जिल्हाभरात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे कृषी विभागाला सुद्धा प्रमाणित बियाण्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मा सदस्य सरनाईक यांनी केली असून "शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याला वेळेवर बियाणे मिळाले नाही तर पेरण्याच रखडतील. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवून वरिष्ठ पातळीवरून प्रमाणित बियाणेचे अतिरिक्त कोटा मंजूर करून घ्यावा.अशी मागणी देखील जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी व महाबिजकडे केली आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळात शेतकरी होरपळत असताना पालकमंत्री कुठे?;

दुष्काळात शेतकरी होरपळत असताना पालकमंत्री कुठे?;

Chikhli Taluka Farmer: सोयाबीन, तूर, कापूस, उडीद आदी पिके करपण्याच्या स्थितीत असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री व सहपालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाही

Sep 21, 2026
चिखलीसह घाटावरील तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यासह हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई अदा करा...

चिखलीसह घाटावरील तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यासह हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई अदा करा...

Chikhli Taluka Drought: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात आज कृषीमंत्री ना. दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. कृषीमंत्री विद्यापीठातील शिवार फेरीच्या कार्यक्रम

Sep 20, 2026
पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

पिके करपली, शेतकरी चिंतेत; अन् नांदेडच्याआढावा बैठकीत AC सभागृहात काजू-बदामाचा नाश्ता

मराठवाड्यात पावसाची तूट असताना नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक झाली. बैठकीतील काजू-बदामाच्या नाश्त्याचा VIDEO व्हायरल झाल्यानंतर टीका सुरू झाली.

Sep 19, 2026
महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना ९ प्रमुख मागण्या

महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना ९ प्रमुख मागण्या

शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. शेतकरी मदत, कर्जमाफी, पीकविमा आणि चारा छावण्यांसह ९ मागण्या मांडल्या.

Sep 18, 2026
चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

Chikhli Taluka Drought: तालुक्यात गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिके आता पाण्याअभावी करपली

Sep 16, 2026